ETV Bharat / state

IMA Help to Covid Worrier Family Shirdi : कोरोनाकाळात मृत्यू; आयएमएने दिले शिर्डीतील कोरोनायोध्याच्या परिवारास दहा लाख रुपये - इंडियन मेडिकल असोसएशन शिर्डी डॉ. निधन

इंडियन मेडिकल असोसएशनच्या ( IMA Shirdi ) शिर्डी शाखेचे सदस्य असलेले शासकीय वैद्यकीय अधिकारी स्व. डॉ. देविदास लव्हाटे यांचे कोरोनाकाळात निधन झाले. ( IMA Shirdi Member Died ) यानंतर आज इंडियन मेडिकल असोसिशनच्या शिर्डी शाखेने दिवंगत डॉ. लव्हाटे यांच्या पत्नी रेश्मा लव्हाटे यांना 10 लाखाचा धनादेश सुपूर्द केला. ( IMA Help to Covid Worrier Family Shirdi )

IMA Help to Covid Worrier Shirdi
आयएमएने दिले कोरोनायोध्याच्या परिवारास दहा लाख रुपये
author img

By

Published : Mar 21, 2022, 6:10 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - इंडियन मेडिकल असोसएशनच्या ( IMA Shirdi ) शिर्डी शाखेचे सदस्य असलेले शासकीय वैद्यकीय अधिकारी स्व. डॉ. देविदास लव्हाटे यांचे कोरोनाकाळात निधन झाले. ( IMA Shirdi Member Died ) यानंतर आज इंडियन मेडिकल असोसिशनच्या शिर्डी शाखेने दिवंगत डॉ. लव्हाटे यांच्या पत्नी रेश्मा लव्हाटे यांना 10 लाखाचा धनादेश सुपूर्द केला. ( IMA Help to Covid Worrier Family Shirdi )

कोरोनासोबत झुंज अपयशी -

डॉ. देविदास लव्हाटे हे नगर येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात कोरोनाकाळात कोरोना बाधित रुग्णांची सेवा करत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना त्वरित उपचारासाठी जिल्हा कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. याकाळातही त्यांनी अनेक रुग्णांना धीर देण्याचे काम केले. मात्र, उपचारादम्यान त्यांची प्रकृती गंभीर होऊन कोरोना विषाणू सोबत चाललेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली.

त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलीच्या भविष्यासाठी देशभरातील डॉक्टरांची अग्रगण्य संघटना म्हणून कार्यरत असलेल्या आयएमएच्या शिर्डी शाखेचे अध्यक्ष व साईबाबा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, सचिव डॉ. स्वाधीन गाडेकर, उपाध्यक्ष डॉ. मधुरा जोशी, कोषाध्यक्ष डॉ. देवराम तांबे, मार्गदर्शक डॉ. दत्ता कानडे, डॉ. विजय नरोडे, डॉ. दीपक कांदळकर, डॉ. रवींद्र अंत्रे यांनी आंतरराष्ट्रिय कोषाध्यक्ष डॉ. रवींद्र वानखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सहजानंद सिंग, राष्ट्रीय सचिन डॉ. जयेश लेले यांच्याकडून धनादेश मंजूर करून घेतला.

हेही वाचा - Raghunath Kuchik Case : 3 ते 4 दिवसात दूध का दूध, पाणी का पाणी होईल - रुपाली चाकणकर

शिर्डी येथे झालेल्या वैद्यकिय प्रशिक्षण शिबिरात सदरचा धनादेश रेश्मा लव्हाटे यांना प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. गौरव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला. यावेळी शिर्डी-राहाता परिसरातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय व्यवसायिक उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.