अहमदनगर - शिर्डी-राहुरी रस्त्यावरील देवळाली प्रवारा येथे पेट्रोल पंपाजवळ १९ लाख ५२ हजार रुपयांचा बनावट विदेशी दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे. यासंबंधी दोघांना रंगेहात अटक केली असून, राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
श्रीरामपूरच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून आरोपी रिजवान ईनामदार आणि सांडू शेख यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून नामांकित कंपनीचे नाव वापरून तयार केलेल्या बनावट दारुचे ४५ बॉक्स, एक पिकअप वाहन, एक मारुती सुझुकी इर्टिगा कार जप्त करण्यात आली आहे.
हेही वाचा पालघरमध्ये लाखोंचे अवैध विदेशी मद्य जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
श्रीरामपूर भरारी पथकातील प्रभारी निरीक्षक सुरज कुसळे, पी.बी. अहिरराव, के. यु. छत्रे, बीटी घोरतळे, ए. व्ही. पाटील, ए बी बनकर, राजेंद्र कदम, विकास कंठाळे तसेच संगीता जाधव, वर्षा जाधव यांनी ही कारवाई केली असून, सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.