शिर्डी - अलीकडच्या काळात साई संस्थान (Sai Sansthan Shirdi) सतत काही कारणाने नेहमीच चर्चेत असते. साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी साईबाबा एका विशिष्ट धर्माचे असल्याचा उल्लेख करून मोठ्या वादाला तोंड फोडलं आहे. एका कार्यक्रमात साईबाबा एका विशिष्ट धर्माचे असल्याचं वादग्रस्त वक्तव्य बानायत यांनी केले होते. त्यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहे. या विरोधात शिर्डीकर आक्रमक झाले आहेत. शिर्डी ग्रामस्थ दिंगबर कोते (Digambar Kote protest) यांनी हातात निषेध फलक घेऊन व्दारकामाई समोर मूक आंदोलन केले आहे.
साईबाबा एका विशिष्ट धर्माचे फकीर
साईबाबा एका विशिष्ट धर्माचे फकीर होते, असे वादग्रस्त वक्तव्य साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांनी आपली जात धर्म आणि जन्म कुठे झाला. या संदर्भात कधीही कोणाला सांगितले नाही. श्री साईचरित्र ग्रंथामध्ये देखील साईबाबांच्या जात आणि धर्म तसेच जन्माविषयी कुठेही उल्लेख नाही. संस्थानच्या अधिकारी बानायत यांनी साईबाबा एका विशिष्ट धर्माचे असल्याचं वक्तव्य केले आहे.
वक्तव्याबद्दल माफी मागावी
नागपूर येथून काही महिन्यांपूर्वीच आईएएस भाग्यश्री बानायत यांची साईबाबा संस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना साईबाबा संस्थानच्या अधिकारी म्हणून पदभार स्विकारुन 4 महिने झालेत. साईबाबा एका विशिष्ट धर्माचे फकीर होते. असे व्यक्तव्य केल्याने भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे. याबद्दल त्यांनी ताबडतोब माफी मागावी अशी मागणी शिर्डीतील ग्रामस्थ दिंगंबर कोते यांनी केली आहे.
बानायत यांनी मागितली माफी
साईबाबांच्या जन्मभूमीवरूनही वाद झाला होता. तो मुख्यमंत्र्याच्या मध्यस्थीने मिटवण्यात आला. आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुन्हा असे विधान केल्याने शिर्डीकरांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याबाबतीत भूमिका ठरवण्यासाठी ग्रामस्थांनी आज संध्याकाळी शिर्डीत बैठकही आयोजित केली होती. त्याआधी साई संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे आणि इतर विश्वस्तांसमवेत गावकऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात भाग्यश्री बानायतही उपस्थित होत्या. यावेळी बानायत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. साईबाबांना विषय खोटी माहिती देणाऱ्यावर कारवाईही करणार असल्याचे भाग्यश्री बानायत यांनी सांगितले.
हेही वाचा - NCP Slams PM : 'गंगाने बुलाया है' म्हणणार्या पंतप्रधानांनी अजून गंगा स्वच्छ केली नाही - नवाब मलिक