अहमदनगर - मी तिकडूनच आली आहे, त्यामुळे मला सर्व गोष्टी माहित आहे, असे टिका मुंबई भाजपच्या नवनियुक्त उपाध्यक्ष यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर येथे केली. काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे गुणगान करणाऱ्या चित्रा वाघ यांनी आता भाजपमध्ये येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधकांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, ही सुरुवातही त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नातू रोहित पवार यांच्यापासून केली आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांचा स्वाभिमानी 'वाघ' आता विधानसभेच्या रणांगणात?
जिल्ह्यातील कर्जत इथे आयोजित 'गाठूया शिखर नवे' ह्या महिला मेळाव्यात त्यांनी हा निशाणा रोहित यांचे नाव न घेता साधला. पालकमंत्री राम शिंदे यांच्या पत्नी आशा शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या या मेळाव्यास प्रसिद्ध मराठी अभिनेत्री साई ताम्हणकर, समाजप्रबोधनकार अॅड. अपर्णा रामतीर्थकर, धनश्री विखे-पाटील व सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर, सभापती साधना कदम, नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, जि.प.सदस्य सुनीता खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा - साताऱ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? उदयनराजेंना तगडं आव्हान
भाजपमधे प्रवेश करताच महिला भाजप उपाध्यक्षपद आणि त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद चित्रा वाघ यांना मिळाले आहे. त्यामुळे काहीशा जोशात असलेल्या वाघ यांनी कर्जत-जामखेड मधे पालकमंत्री राम शिंदे यांच्या विराधात आव्हान उभे करू पाहणाऱ्या रोहित पवारांचा मार्मिक टोला लगावत समाचार घेतला.
हेही वाचा - अमिताभ बच्चनच्या 'जलसा' बाहेर तीव्र आंदोलन, २२ विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी यावेळी राम शिंदे यांना पुन्हा निवडून देण्याचे उपस्थित महिलांना केले तर मेळाव्याच्या आयोजक आशा राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मधील नागरिकांनी आपला स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी बाहेरून येत असलेल्या धनदांडग्याना धडा शिकवा असे आवाहन केले.