ETV Bharat / state

कौटुंबिक वाद पोहोचला पोलीस ठाण्यात, पतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतले पेटवून

शहरातील बागवान गल्लीतील अबुबकर हबीन याचे अनेक दिवसांपासून पत्नीसोबत वाद सुरू आहेत. पत्नी-पत्नी एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचे तक्रार अर्ज दोघांनीह पोलीस ठाण्यात दाखल केले आहे.

अबुबकर हबीन
author img

By

Published : Feb 26, 2019, 3:30 PM IST

अहमदनगर - कौटुंबिक वादातून पत्नीविरुद्ध तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीने पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पोलिसांनी सतर्कता दाखवित तात्काळ आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. या व्यक्तीला उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी दुपारी ४ वाजता घडली असून अबूबकर हबीन (रा. बागवान गल्ली) असे त्याचे नाव आहे.

संबंधित व्हिडीओ

शहरातील बागवान गल्लीतील अबुबकर हबीन याचे अनेक दिवसांपासून पत्नीसोबत वाद सुरू आहेत. पत्नी-पत्नी एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचे तक्रार अर्ज दोघांनीह पोलीस ठाण्यात दाखल केले आहे. तर अबुबकर हबीनचारित्र्याची बदनामी करत असल्याचे त्याच्या पत्नीने म्हटले आहे. वैयक्तिक स्वरूपाच्या आरोपाबाबत कुठलेही पुरावे नसल्याने व कौटुंबिक वादात काय कारवाई करायची, असा प्रश्न पोलिसांना पडला होता.

अबुबकर कुठलीही पूर्वसूचना न देता आज दुपारी चार वाजताच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आला. अंगावर रॉकेल ओतून घेत त्याने काडीपेटीने पेटवून घेतले. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अबुबकर याला उपचारासाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

Intro:अहमदनगर- पत्नीसोबतच्या कौटुंबिक वादातून पतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतले पेटवून.. Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे

अहमदनगर- पत्नीसोबतच्या कौटुंबिक वादातून पतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतले पेटवून..

अहमदनगर- कौटुंबिक वादातून पत्नीविरुद्ध तक्रार अर्ज करणाऱ्या अबूबकर हबीन बागवान या पतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. पोलिसांनी तात्काळ त्याला विझविल्याने मोठा अनर्थ टळला. सदर व्यक्तीला उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, शहरातील बागवान गल्लीतील एकाचे अनेक दिवसांपासून पत्नीसोबत वाद सुरू आहेत. पत्नीच्या चारित्र्यावर त्याच्याकडून संशय घेतला जात आहे. याबाबत काही तक्रार अर्ज त्याने पोलीस ठाण्यात दिलेले आहेत. पत्नीनेही त्याच्या विरोधात तक्रार अर्ज देऊन तो चारित्र्याची बदनामी करत असल्याचे  म्हटले आहे. वैयक्तिक स्वरूपाच्या आरोपाबाबत कुठलेही पुरावे नसल्याने व कौटुंबिक वादात काय कारवाई करायची, असा प्रश्न पोलिसांना पडला होता.
सदर महिलेच्या पतीने कुठलीही पूर्वसूचना न देता तो आज दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आला. अंगावर रॉकेल ओतून घेत त्याने काडेपेटीने पेटवून घेतले. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आग विझवली . त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
सदर व्यक्तीला उपचारासाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- पत्नीसोबतच्या कौटुंबिक वादातून पतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतले पेटवून..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.