ETV Bharat / state

शिर्डीत दुहेरी हत्याकांड; शेतकरी कुटुंबातील पती-पत्नीची निर्घृण हत्या - Korhale murder news

शेतकरी कुटुंबातील पती-पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहता तालुक्याच्या कोर्हाळे येथील वस्तीमध्ये ही घटना घडली.

शिर्डी
शिर्डी
author img

By

Published : Jun 26, 2021, 12:01 PM IST

Updated : Jun 26, 2021, 2:27 PM IST

अहमदनगर - शिर्डीत दुहेरी हत्याकांड घडले आहे. शेतकरी कुटुंबातील पती-पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहता तालुक्याच्या कोर्हाळे येथील वस्तीमध्ये ही घटना घडली.

शेतकरी कुटुंबातील पती-पत्नीची निर्घृण हत्या

शशिकांत श्रीधर चांगले (वय 60) तर सिंधुबाई शशीकांत चांगले (वय 55) या पती-पत्नीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शशिकांत चांगले आणि सिंधुबाई चांगले हे दोघेही पती-पत्नी शेतकरी असून कालच आपल्या मुलांना भेटून घरी आले होते. सकाळी लवकर उठवून शेतात काम करण्यासाठी जाणारे पती-पत्नी आज का लवकर उठले नाही, म्हणून शेजरच्यांनी घरात डोकावलं तर दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.

घटनेची माहिती स्थानिकांनी राहाता पोलिसांना दिली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला आहे. अतिरिक्त पोलीस अध्यक्ष दिपाली काळे आणि पोलीस उपअधिकारी संजय सातवसह मोठा पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. या पती-पत्नीवर फावड्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहीती समोर येत असुन हत्येमागचे कारण आद्यपही अस्पष्ट आहे. श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Last Updated : Jun 26, 2021, 2:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.