अहमदनगर - (अकोले) तालुक्यातील ( Ahmednagar Akole Taluka ) आदिवासी पट्ट्यामध्ये भात हे प्रमुख पीक मानले जाते. भात शेतीवरच आदिवासी बांधवांचा संसार आणि उदरनिर्वाह अवलंबून असतो. चालू खरीप हंगामात जून महिना पूर्ण कोरडा गेल्याने कसेबसे उतरलेले भात रोपे नंतर आलेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेली आहेत. तर भात रोपे ( Rice farming ) वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची ( Tribal farmers ) मोठ्या प्रमाणावर धड पड सुरू आहे.
आदिवासी पट्ट्यातील बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक ( Smallholder farmers ) तसेच भात खासराच्या छोट्या छोट्या जमिनी असलेले आहेत. कमी क्षेत्रावर गुजरान करावी लागत असल्याने अगोदरच वर्ष कसे काढायचे हा प्रश्न निर्माण झालेला असतो. बहुसंख्य शेतकरी खरिपाची कामे आवरल्यानंतर दोन पैसे हातात पडावेत म्हणून मोलमजुरीसाठी आपली गावे सोडून काही काळासाठी स्थलांतर करत असतात. त्यातच यंदा अतिवृष्टीमुळे भात रोपे म्हणावी तेवढी सुदृढ आणि तजेलदार नसल्याने शेतकरी वर्गात चिंता आहे.
कॅल्शियम नायट्रेट या खताची फवारणी द्यावी - अतिवृष्टीपासून भात रोपांचे संरक्षण करण्यासाठी रोपवाटिकेत जास्त झालेले पाणी शेताबाहेर काढून देण्याचे नियोजन बहुसंख्य शेतकरी करत आहे. पिवळ्या पडलेल्या रोपांना वाचवण्यासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची चूळ भरनी रोपांना करावी तसेच कॅल्शियम नायट्रेट या खताची फवारणी द्यावी असा सल्ला कृषी तज्ञांनी शेतकरी वर्गाला दिला आहे. अतिवृष्टीमुळे पाळीव प्राण्यांची हाल होत आहेत. पावसामुळे जनावरे चरण्यासाठी सोडता येत नाहीत. घरात मुबलक चारा उपलब्ध नाही. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
हेही वाचा : नंचियाम्मा बनली राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी पहिली आदिवासी गायिका