ETV Bharat / state

भंडारदरा परिसरात पावसाचा जोर कायम; भात लावणीला वेग, तर पर्यटकांची गर्दीही वाढली - भातपिकाची लावणी

भंडारदरा धरणाचे पाणलोट क्षेत्र तसेच कळसूबाई हरिश्चंद्रगड परिसरात एक जुलै पासून चांगला पाऊस पडत असल्याने शेतकरी सुखावला आहे. शेतकऱ्यांनी भात पिकाची लावणी सुरु केली असून परिसरातील पर्यटनालासुद्धा गती मिळाली आहे.

भाताची लावणी करताना शेतकरी
author img

By

Published : Jul 10, 2019, 11:08 AM IST

Updated : Jul 10, 2019, 1:30 PM IST

अहमदनगर- भंडारदरा धरणाचे पाणलोट क्षेत्र तसेच कळसूबाई हरिश्चंद्रगड परिसरात एक जुलैपासून चांगला पाऊस पडत असल्याने शेतकरी सुखावला आहे. जोरदार पावसाने धरणसाठ्यातही वाढ होत आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी भातपिकाची लावणी सुरू केली आहे, तर दुसरीकडे पर्यटकांच्या गर्दीने परिसर गजबजून गेला आहे.

पावसाच्या पाण्याने फुलून गेलेल्या निसर्गाचे मनमोहक दृष्य

आदिवासी पट्ट्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाने भातखाचरे तुडुंब भरली आहेत. यात भातलावणी इतके पाणी साठले आहे. त्यामुळे भात लावणीला वेग आला आहे. डोक्यावर ईरळे, घोंगडी व प्लास्टिक कागद घेऊन शेतकरी भाताची लागवड करीत आहे. पावसाच्या आगमनाने आदिवासी शेतकरी मुलाबाळांसह शेतीच्या कामात गुंतले आहेत. साम्रद, उडदावणे, शिंगणवाडी, लव्हाळवाडी, कोरठवाडी, घाटघर येथील भात लावणीची कामे सुरू झाली आहेत. नातेवाईकांना एकजूट करून शेतकरी शेतीची कामे करू लागले आहेत. या क्षेत्रात मुख्य पीक भात असल्याने शेतकरी भाताच्या हळे, गावे, इंद्रायणी, काक, भात, २४८, जिरवेल, आंबेमोहर, रूपाली, पूनम, गोवर्धन, कोळपी आदी भातपिके लावून जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, यंदा योग्य वेळी पाऊस न पडल्याने देवावर हवाला ठेवून गरीब आदिवासी शेतकरी भातपिकांचे नियोजन करीत आहेत.

पावसामुळे धरणांमध्ये सुद्धा पाणी भरले आहे. भंडारदरा धरणात मंगळवारी सायंकाळी सहा वाजता पाणी पातळी दोन हजार ४७६ दशलक्ष घनफूट होती. दरम्यान, शनिवारी सकाळी सहा ते सोमवारी सायंकाळी सहा या ४८ तासांच्या कालावधीमध्ये पडलेल्या पावसात भंडारदरा धरणात तब्बल १ हजार ३८४ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. पावसाने चांगले आगमन केल्याने फुलून गेलेल्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले परिसरात वळू लागली आहेत.

रविवारी सर्वाधिक पाऊस पांजरे येथे झाला तर घाटघर येथे मोठ्या प्रमाणात धुके व पाऊस सुरू होता. भंडारदरा धरण परिसरात शनिवारी आणि रविवारी धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. रिमिक्सच्या गाण्यांवर ताल, ठेका धरत, धबधब्याखाली बसून, पावसाचे तुषार झेलत, नाचत, बागडत पर्यटक आनंद लुटत होते. धरण परिसरात लोकांची गर्दी पाहता यापुढे सुट्यांच्या काळात पर्यटकांची अधिक गर्दी होणार असल्याची शक्यता आहे.

अकोले तालुक्यात मंगळवार पर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी

सोमवारीची पर्जन्यवृष्टी आणि आजपर्यंतची एकूण पर्जन्यवृष्टी मिलिमीटरमध्ये

घाटघर- १४७ - ११३४
रतनवाडी-१४४-१०४२
भंडारदरा-१२९-७१८
निळवंडे-५६-२८२
पांजरे-१६६–८२९
कोतुळ-१९-२४३
अकोले-३०-३७८
आढळा -१२-११२
वाकी- १९-२४३

धरणात ८ जुलै सकाळी सहा पर्यंत एकूण पाणीसाठा -

भंडारदरा २४७६ दलघफु
निळवंडे ८१४ दलघफु

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ भंडारदरा धरणाचे पाणलोट क्षेत्र तसेच कळसूबाई हरिश्चंद्रगड परिसरात एक जुलै पासून चांगला पाऊस पडत असल्याने एकीकडे आदिवासी शेतकऱ्यांनी भातपिकाची आवणी सुरू केली आहे तर दुसरीकडे पर्यटकांच्या गर्दीनेही परिसर गजबजून गेला आहे....

VO_ अकोले तालुक्यातील कोलटेंबे, घाटघर, रतनवाडी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी उसळली असल्याचे पाहावयास मिळत आहे.
भंडारदरा धरणात मंगळवारी सायंकाळी सहा वाजता पाणी पातळी दोन हजार ४७६ दशलक्ष घनफूट होती. दरम्यान, शनिवारी सकाळी सहा ते सोमवारी सायंकाळी सहा या ४८ तासांच्या कालावधीमध्ये भंडारदरा धरणात तब्बल १ हजार १३८४ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. पावसाने चांगले आगमन केल्याने फुलून गेलेल्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले परिसरात वळू लागली आहेत. रविवारी सर्वाधिक पाऊस पांजरे येथे झाला तर घाटघर येथे मोठ्या प्रमाणात धुके व पाऊस सुरू होता. धरण परिसरात आणि आजूबाजूने धबधबे पाहण्यास पर्यटकांची भंडारदरा परिसरात शनिवारी आणि रविवारी मोठी गर्दी झाली होती. रिमिक्सच्या गाण्यांवर ताल, ठेका धरत, धबधब्याखाली बसून, पावसाचे तुषार झेलत, जलधारा अंगावर घेत, नाचत, बागडत पर्यटक आनंद लुटत आहेत. यात महिलाही आघाडीवर आहेत. गाण्याच्या भेंडय़ा खेळत, चित्रपटातील आणि देशभक्तीपर गाणी म्हणत आनंद साजरा केला जात आहे. धरण परिसरात यापुढे सुट्यांच्या काळात पर्यटकांची अधिक गर्दी असेल....

VO_आदिवासी पट्टय़ात सुरु असलेल्या जोरदार पावसाने भातखाचरे तुडुंब भरल्याने आवणीइतके पाणी साठले आहे. भात लावणीला वेगाने सुरुवात झाली आहे. डोक्यावर ईरळे, घोंगडी व प्लास्टिक कागद घेऊन गाळ तुडवित भाताची लावणी सुरू झाली आहे. आदिवासी शेतकरी मुलाबाळांसह शेतीच्या कामात गुंतले आहेत. साम्रद, उडदावणे, शिंगणवाडी, लव्हाळवाडी, कोरठवाडी, घाटघर येथील आवणीची कामे सुरु झाली आहेत. इरजूक करून शेतकरी, नातेवाईक, मित्र यांना बोलावून एकमेकांची शेतीची कामे करू लागली आहेत. मुख्य पीक भात असल्याने शेतकरी भाताच्या हळे, गावे, इंद्रायणी, काक, भात, २४८, जिरवेल, आंबेमोहर, रूपाली, पूनम, गोवर्धन, कोळपी आदी भातपिके लावून जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, योग्य वेळी पाऊस न पडल्याने देवावर हवाला ठेवून हे गरीब आदिवासी शेतकरी भातपिकांचे नियोजन करीत आहेत.....

अकोले तालुक्यात मंगळवार पर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी....

सोमवारी पर्जन्यवृष्टी – ऐकून मिलिमीटर

घाटघर-१४७-११३४

रतनवाडी-१४४-१०४२

भंडारदरा-१२९-७१८

निळवंडे-५६-२८२

पांजरे-१६६–८२९

कोतुळ-१९-२४३

अकोले-३०-३७८

आढळा -१२-११२

वाकी- १९-२४३

धरणात ऐकून पाणी साठा ८ जुलै सकाळी सहा पर्यंत....

भंडारदरा २४७६ दलघफु

निळवंडे ८१४ दलघफुBody:MH_AHM_Shirdi_Rain Water_ 10_Visuals_Bite_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Rain Water_ 10_Visuals_Bite_MH10010
Last Updated : Jul 10, 2019, 1:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.