अहमदनगर- इन्फ्लूएंझा बाधित युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या 23 वर्षीय तरुणाला H3N2 या इन्फ्लूएंझाची लागण झाली होती. सोबतच त्याला कोरोनाचीही लागण झाली होती. हा युवक अलिबाग येथे मित्रांसोबत ट्रीपला गेला होता, त्यानंतर त्याची तब्येत खराब झाल्याने तो शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता.
दरम्यान सोमवारी रात्री 10.30 वाजता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबत मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी दुजोरा दिला आहे. मात्र, त्याचा मृत्यू नेमकी इन्फ्लूएंझाने झाली की कोरोनाने हे तपासणी अहवाल आल्यानंतर समजणार आहे. इन्फ्लूएंझाने मृत्यू झाला असल्यास महाराष्ट्रातील हा पहिला तर देशातील तिसरा बळी ठरू शकतो. रुग्णाला दोन्ही प्रकारचे आजार असल्याचे सांगितले जाते आहे. आरोग्य विभागाने कमिटी नेमली आहे. त्यांचा अहवाल आल्यावर रुग्णाचे मृत्यूचे कारण कळणार आहे.
देशभरात रुग्णांची संख्या वाढत आहे कोरोना व्हायरसने महाराष्टातील जनतेला जेरीस आणले होते. आता H3N2 ने राज्यातील जनतेची चिंता वाढवली आहे. या विषाणूने लागण झालेले लोक सर्दी आणि खोकल्यामुळे 15 ते 20 दिवस आजारी पडतात. प्रत्यक्षात हा आजार साधारणपणे ४-५ दिवसात बरा होऊ शकतो. H3N2 मुळे मंगळवारी गुजरातमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देशभरात रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थिती डॉ. शैलेंद्र गुप्ता यांनी आरोग्याचा महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, ऋतु बदलत असताना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी होते. आपण व्हायरल इन्फेक्शन झाल्याचे म्हणतो. अशा रुग्णांच्या संख्येत अलीकडच्या काळात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
जास्त काळ राहतो इन्फ्लूएंझा हा आजार विषाणू इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होतो. इन्फ्लूएंझा व्हायरसमध्ये 'बी' आणि 'सी' हे सामान्य संक्रमण करणारे विषाणू आहेत. संसर्गामध्ये हा संसर्ग इन्फ्लूएन्झाच्या 'ए' प्रकारातील उपप्रकार आहे. हाच उपप्रकार H3N2 म्हणून ओळखण्यात येत आहे. हा संसर्ग सामान्य विषाणूसारखाच असतो. परंतु हा आठवडा फरक फक्त संसर्गाच्या कालावधीत वेगळा आहे. सर्दी-खोकल्याबरोबरच ताप आणि अंगदुखी हे 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ जाणवते. यामध्ये रुग्णाला शरीरात अधिक कमालीचा अशक्तपणा जाणवत असतो.