अहमदनगर - शिर्डी साईमंदिरात काल्याच्या किर्तनानंतर दहिहंडी फोडून गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता करण्यात आली. शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी भाविकांविना हा उत्सव साजरा करण्यात आलाय. कोरोनामुळे अद्याप मंदिर भाविकांसाठी बंद आहे. त्यामुळे या उत्सवासाठी देखील ठराविक विश्वस्त आणि पुजाऱ्यांनाच मंदिरात प्रवेश देण्यात आला होता.
शिर्डी साईमंदिरात काल्याच्या किर्तनानंतर दहिहंडी फोडून गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील 17 मार्चपासून साई मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले. यांदाचा गुरुपौर्णिमा उत्सव भाविकांविनाच साई संस्थानला साजरा करावा लागल आहे. पहाटे साईबाबांच्या काकड आरतीने आजच्या दिवसाची सुरुवात झाली. तसेच आज उत्सवाचा शेवटचा म्हणजेच तिसरा दिवस असल्याने सकाळी साईमूर्ती आणि समाधीला मंगलस्नान घालण्यात आले. त्यानंतर साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गुरुस्थान मंदिरात महारुद्राभिषेक करण्यात आला.
गुरुपौर्णिमा उत्सवाचा सांगता दिवस असल्याने आज साईमंदिरात काल्याचे किर्तन पार पडले. त्यानंतर दहीहंडी फोडून दुपारची मध्यान्ह आरती पार पडली आणि उत्सव समाप्त झाला.