ETV Bharat / state

तोडगा नाही ! राम शिंदेच्या भेटीनंतरही शेतकरी कन्यांचे अन्नत्याग सुरुच

अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींची आज दुपारी पालकमंत्री राम शिंदे यांनी भेट घेत चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली असून या मुलींनी आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले आहे.

तोडगा
author img

By

Published : Feb 8, 2019, 10:59 PM IST

अहमदनगर - गेल्या ५ दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींची आज दुपारी पालकमंत्री राम शिंदे यांनी भेट घेत चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली असून या मुलींनी आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले आहे. जोपर्यत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यां मुलींनी केला आहे.

तोडगा
undefined

महाविद्यालयीन जीवनात शिक्षण घेत असताना आपल्या गावातील शेतकरी चळवळीचे बाळकडू मिळालेल्या पुणतांबे येथील तीन मुलींनी आंदोलनाचे हत्यार हाती घेतले आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी ५ दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. काल अशक्तपणामुळे एकीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर दोघी आंदोलनस्थळीच हट्टाला पेटल्या आहेत. सरकारचे प्रतिनीधी म्हणून आज जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी मुलींची भेट घेऊन चर्चा केली आहे. मात्र, मुलींनी मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन सोडणार नसल्याचे सांगितले आहे. शुभांगी संजय जाधव, निकिता धनंजय जाधव व पुनम राजेंद्र जाधव या पुणतांबे येथील तिघीही १९ ते २० वयोगटातील युवती आहेत. शुभांगी आणि पुनम बीएसस्सीचे शिक्षण घेत आहेत, तर निकिता लॉचे शिक्षण घेत आहे. तिघीनींही पाच दिवसांपूर्वी पुणतांब्यात अन्नत्याग आंदोलन (उपोषण) सुरू केले आहे. या आहेत मागण्या - शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, संपूर्ण कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, कृषीसंलग्न वस्तुंवरील जीएसटीतून माफी, सुक्ष्मसिंचन, कृषी अवजारांवरांना शंभर टक्के अनुदान, शेतीमालाला हमीभाव मिळावा, दुधाचे दर वाढून मिळावेत, अशा अनेक मागण्या त्यांनी केल्या आहेत.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणला उपोषण सुरू असतानाच या तिनही मुली उपोषणाला बसल्या होत्या. हे आंदोलनाकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. मात्र, स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांनी मोर्चाही काढला. ग्रामस्थांनी भीकमांगो आंदोलन केले. मात्र, तरीही प्रशासनाने त्यांची विशेष काळजी घेतली नाही. पुणतांबे येथून शेतकरी आंदोलनाने महाराष्ट्राला धडा दिला. किसान क्रांती शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली हे आंदोलन झाले होते. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. त्यामध्ये धनंजय जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. जाधव यांच्या मुली निकिताने वडिलांचा कित्ता गिरवला आहे. युवतींना संघटीत करून तिने शेतकऱ्यांच्या प्रश्न उचलून धरला आहे.

Intro:
Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ गेल्या पाच दिवसा पासुन अन्नत्याग आंदोलन करणार्या मुलींची आज दुपारी पालकमंत्री राम शिंदे यांनी भेट घेत चर्चा केली मात्र ती निष्फळ ठरली असुन या मुलींच आंदोलन सुरुच राहणार आहे....

VO_महाविद्यालयीन जीवनात शिक्षण घेत असताना आपल्या गावातील शेतकरी चळवळीचे बाळकडू मिळालेल्या पुणतांबे येथील तीन मुलींनी आंदोलनाचे हत्यार हाती घेतले आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी पाच दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. अशक्तपणामुळे एकीला रुग्णालयात दाखल केले, तर दोघी आंदोलनस्थळीच हट्टाला पेटल्या आहेत. सरकारचे प्रतिनीधी म्हणुन जिल्ह्याचे पालकमंत्री येवुन चर्चा केली आहे मात्र मुलींनी मागण्या मान्य झाल्या शिवाय आंदोलन सोडणार नसल्याच सांगीतलय....

BITE_ राम शिंदे पालकमंत्री

VO_शुभांगी संजय जाधव, निकिता धनंजय जाधव व पुनम राजेंद्र जाधव या पुणतांबे येथील तिघीही १९ ते २० वयोगटातील युवती आहेत. शुभांगी आणि पुनम बीएसस्सीचे शिक्षण घेत आहेत, तर निकिता लॉचे शिक्षण घेत आहे. तिघीनींही पाच दिवसांपूर्वी पुणतांब्यात अन्नत्याग आंदोलन (उपोषण) सुरू केले आहे....शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, संपूर्ण कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, कृषीसंलग्न वस्तुंवरील जीएसटीतून माफी, सुक्ष्मसिंचन, कृषी अवजारांवरांना शंभर टक्के अनुदान, शेतीमालाला हमीभाव मिळावा, दुधाचे दर वाढून मिळावेत, अशा अनेक मागण्या त्यांनी केल्या आहेत.....

BITE_निकीता जाधव आंदोलक मुलगी

VO_ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणला उपोषण सुरू असतानाच या तिनीही मुली उपोषणाला बसल्या होत्या . हे आंदोलन गाजत असूनही या तिघींकडे प्रशासनाचे विशेष लक्ष गेले नाही. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांनी मोर्चाही काढला. ग्रामस्थांनी भीकमांगो आंदोलन केले. परंतु तरीही प्रशासनाने त्यांची विशेष काळजी घेतली नाहीये पुणतांबे येथून शेतकरी आंदोलनाने महाराष्ट्राला धडा दिला. किसान क्रांती शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली हे आंदोलन झाले होते. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. त्यामध्ये धनंजय जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.जाधव यांच्या मुली निकिताने वडिलांचा कित्ता गिरविला. युवतींना संघटीत करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढ्यास ती उभी राहिली आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकरी आंदोलनाच गाव म्हणुन गाजत राहणार आहे.....
Body:8 Feb Shirdi Puntamba Ram Shinde VistConclusion:8 Feb Shirdi Puntamba Ram Shinde Vist
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.