ETV Bharat / state

साई मंदिरात सुरू होणार गोकुळाष्टमी उत्सव, जुन्या परंपरेची पुन्हा सुरुवात - शिर्डी मंदिर

साईबाबांच्या हयाती पासून शिर्डीत साजरा होणारा गोकुळाष्टामी उत्सव मध्यंतरी बंद करण्यात आला होता. मात्र हा उत्सव पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे.

sai shirdi news
साई मंदिरात सुरू होणार गोकुळाष्टमी उत्सव, जुन्या परंपरेची पुन्हा सुरुवात
author img

By

Published : Jul 18, 2020, 4:29 PM IST

अहमदनगर - साईबाबांच्या हयातीपासून शिर्डीत साजरा होणारा गोकुळाष्टमी उत्सव मध्यंतरी बंद करण्यात आला होता. मात्र हा उत्सव पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे. गोकुळाष्टमी उत्सव पुन्हा सुरू होणार असल्याने शिर्डी ग्रामस्थांनी साई संस्थानचे अधिकारी डोंगरे यांचा सत्कार केला.

साई मंदिरात सुरू होणार गोकुळाष्टमी उत्सव, जुन्या परंपरेची पुन्हा सुरुवात
साई संस्थानच्या या निर्णयामुळे शिर्डीत गोकुळाष्टमीच्या रूपाने चौथा उत्सव सुरू होणार आहे. साईबाबांच्या हयातीत रामनवमी, गुरूपौर्णिमा व गोकुळाष्टमी उत्सव साजरे करण्यात येत होते. बाबांच्या निर्वाणानंतर पुण्यतिथी उत्सवाची भर पडली. साईभक्त तात्या कोते यांच्याकडे रामनवमी बरोबर गोकुळाष्टमी उत्सवाची जबाबदारी होती. साईबाबांचा समाधीच्या काही वर्षानंतर आठ दिवस चालणारा गोकुळाष्टमी उत्सव हळूहळू मागे पडला. शिर्डी गॅझेटिअरच्या माध्यमातून हा विषय समोर आहे.

सोशल मीडियातही भाविकांनी हा उत्सव सुरू करण्याची मागणी केली होती. यासंबंधी ग्रामस्थांनी साईसंस्थानाला लेखी निवेदनाद्वारे उत्सव सुरू करण्याची मागणी केली होती.

मागील पंचवीस वर्षांपासून सुरू असलेला साईचरित्र पारायण सोहळा श्रावणाच्या पहिल्या दिवशी सुरू होत असे. आता तो साधारण पंधरा दिवस पुढे गोकुळाष्टमीला जोडून घेण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वीचा गोकुळाष्टमी उत्सव पुनर्जिवीत होणार आहे. साईचारित्र पारायण सोहळा श्रीकृष्ण नवरात्रात येत असल्याने त्याचे वेगळे महत्व आहे. या उत्सवामुळे श्रावणात भाविकांचा ओघ वाढणारआहे. कोरोनामुळे यंदा हा उत्सव भाविकांशिवाय साध्या पद्धतीने साजरा होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.