ETV Bharat / state

निता अंबानीकडून साई भक्तांसाठी 1 कोटीचे संरक्षण साहित्य भेट - गुरूपौर्णिमा

गुरूपौर्णिमेचे औचित्य साधत निता अंबानी यांनी साई चरणी आपली गुरु दक्षिणा अर्पित केली आहे.

निता अंबानीकडून साई भक्तांसाठी 1 कोटीचे संरक्षण साहित्य भेट
author img

By

Published : Jul 20, 2019, 7:04 PM IST

अहमदनगर - शिर्डी साईबाबांच्या भक्त निता अंबानी यांनी शिर्डीतील भक्तांसाठी 1 कोटी 17 लाख रुपयांचे संरक्षण साहित्य भेट दिले आहे. भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अंबानी यांनी साई संस्थानाला ही भेट दिली आहे.

निता अंबानीकडून साई भक्तांसाठी 1 कोटीचे संरक्षण साहित्य भेट

गुरूपौर्णिमेचे औचित्य साधत निता अंबानी यांनी साई चरणी आपली गुरु दक्षिणा अर्पित केली आहे. यामध्ये 45 लाख रुपयांचे बॅग स्कॅनर, 5 लाख रुपयांचे 55 हँड डिटेकटर, आणि 15 लाख रुपयांचे 77 वॉकी-टॉकी, असे साहित्य खरेदी त्यांनी शिर्डीला पाठवले आहे.

गेल्या काही वर्षापासुन स्वतः खरेदी करण्याएवढे पैसे असतानही साई संस्थान या वस्तु भाडे तत्वावर वापरत होते. मात्र, आता अंबानीच्या या दानामुळे संस्थानला मोठा फायदा होणार आहे. अंबांनी यांनी दान रुपी पाठवलेल्या या वस्तु शिर्डीत आल्या असून त्यांची साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुळगीकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. या वस्तु साई मंदिरातील मुख्य गेट 1,2,3,4 येथे बसवण्यात आल्या असून त्याचा वापर सुरु आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ शिर्डी साईबाबांच्या निस्सीम भक्त अससेल्या निता अंबानी यांनी शिर्डीतील भक्तांच्या सुरक्षेच्या द्रुष्टीने महत्वाच्या अश्या 1 कोटी 17 लाख रुपयांच्या सौरक्षण साहित्य साई संस्थानाला आज भेट सोरूपात दिले आहे....

VO_ गुरूपौर्णिमेच औचित्य साधत साईंना आपला गुरु मणाऱ्या निता अंबानी यांनी साई चरणी आपली गुरु दक्षिणा अश्या पद्धतीने अर्पित केलीय..45 लाख रुपयांचे बॅग स्कॅनर, 5 लाख रुपयांचे 55 हँड डिटेकटर, आणि 15 लाख रुपयांचे 77 वाकी टॉकी अस साहीत्या खरेदी करुन ते शिर्डीला पाठवलय गेल्या काही वर्षा पासुन स्वत्हा खरेदी करण्याची ताकद असतांना साई संस्थानने या वस्तु भाडे तत्वावर वापरत होते मात्र आता अंबानीच्या या दानामुळे संस्थानला मोठा फायदा होणार आहे..अंबांनी यांनी दान रुपी पाठवलेल्या या वस्तु शिर्डीत आला असून त्यांची साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुळगीकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली आहे..या वस्तु आता साई मंदिरात येणाऱ्या मुख्य गेट 1,2,3,4 येथे बसवन्यात आल्या असुन त्याचा वापरही सुरु करण्यात आलाय....

BITE_दिपक मुळगीकर मुख्यकार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान शिर्डीBody:MH_AHM_Shirdi_Nita Ambani_Donation_20_PKG_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Nita Ambani_Donation_20_PKG_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.