अहमदनगर- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात लाॅकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या महिन्यात उज्वला गॅस धारकांना मोफत गॅस सिलेंडर भरुन देण्याच घोषणा केली. मात्र, सिलेंडरची रक्कम हे गॅस एजन्सी धारकाकडे नव्हे तर ती उज्वला गॅस धारक ग्राहकाच्या खात्यात जमा होणार आहे.
हेही वाचा- COVID-19 : भारताने गाठला चार हजार रुग्णांचा टप्पा; बळींची संख्याही शंभरहून अधिक..
ग्राहकांनी त्यांच्या खात्यातून रक्कम काढायची आहे. त्याच बरोबरीने गॅस एजन्सीकडे नोंद असलेल्या मोबाईल क्रमांकवरुन गॅस सिलेंडर रिफील करण्याची बुकींग करायची आहे. त्या नंबरवर आलेला ओटीपी गॅस वितरण कार्यालयाला देऊन ग्राहकांना मोफत गॅस टाकी मिळणार आहे.
या पहिल्या टाकीची ही प्रक्रिया पुर्ण केल्यानंतरच पुढील दोन टाक्या मोफत मिळणार आहे. तीन महीने उज्वला गॅस मोफत दिले जाणार आहेत. मात्र, त्याची रक्कम बँक खात्यात जमा होणार असल्याने लॉकडाऊनच्या काळात बँकेत जावून ही रक्कम काढण्याची झंझट ग्राहकांना राहणार आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील अनेकांचे मोबाईल रजीस्टर आहेत का? तसेच ते चालू आहेत का? हा ही मोठा प्रश्न आहे.