ETV Bharat / state

पेमरेवाडी मुलभूत सुविधांपासून वंचित; विकासासाठी भाजपवासी झालेले वैभव पिचड आता तरी लक्ष देतील का? - बहिष्कार टाकलेले गाव

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मात्र, आजही अनेक गावे विकासाच्या कोसो दूर आहे. त्यामुळे ग्रामस्थ निवडणुकीवर बहिष्कार टाकतात. अशाच गावांचा आवाज त्यांच्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही 'मत द्यायचंय, पण कोणाला?' ही मालिका राबतोय. या मालिकेतील आजची 'ही' दुसरी कहाणी...

पेमरेवाडी मुलभूत सुविधांपासून वंचित
author img

By

Published : Sep 23, 2019, 6:33 AM IST

अहमदनगर - राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. अनेक राजकीय नेते विकासाचा दावा करीत आहेत. मात्र, जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदार संघात असलेल्या डोंगराळ भागातील पेमरेवाडी गाव विकासाच्या कोसो दूर आहे. गावात साध्या मुलभूत सुविधा देखील नाही. रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्यण घेतला आहे.

पेमरेवाडी मुलभूत सुविधांपासून वंचित; विकासासाठी भाजपवासी झालेले वैभव पिचड आता तरी लक्ष देतील का?

२० ते २५ वर्षांपासून पिचड घराण्याची सत्ता -
पेमरेवाडी गावाचे शासकीय कामकाज संगमनेरमध्ये येते. संगमनेर तालुक्यापासून ४५ किलोमीटर भोजदारी गावाअंतर्गत पेमरेवाडी गाव येते. या गावाची लोकसंख्या जवळपास ३०० ते ४०० आहे. मात्र, हे गाव अकोले विधानसभा मतदारसंघात येते. या मतदारसंघावर जवळपास २० ते २५ वर्षांपासून पिचड घराण्याची सत्ता आहे. मधुकर पिचड यांनी काही वर्ष सत्ता गाजवली. त्यानंतर त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी आमदार म्हणून या भागाचे प्रतिनिधित्त्व केले. मात्र, स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर देखील या पेमरेवाडी हा दुर्गम भाग अजूनही दुर्गमच राहिलेला आहे. कुठलाही लोकप्रतिनिधींनी या गावाकडे कधी लक्षच दिले नाही.

रस्त्याअभावी दगावतात रुग्ण -
अतिदुर्गम, उंच डोंगरावर असलेली पेमरेवाडी आजही विकासापासून कोसोदूर आहे. रस्ते, पाणी या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाही. गावाला जाण्यासाठी १५ ते २० किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. त्यातही पक्का रस्ता नाही. त्यामुळे गुडघाभर चिखलातून कसरत करत त्यांना तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. गावात एखादा गंभीर रुग्ण असले तर रस्त्याअभावी त्याला वेळेत उपचार मिळू शकत नाही. प्रसंगी अनेकांचे मृत्यू होतात.

महामार्गापासून फक्त ५ किलोमीटर -
नाशिक-पुणे महामार्गापासून हे गाव फक्त ५ किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, गाव आणि महामार्ग यामध्ये जंगल आहे. त्यामुळे लोकांना महामार्ग गाठणे शक्य होत नाही. मात्र, जंगलातून या गावासाठी पक्का रस्ता बनवून दिल्यास काही मिनिटात महामार्ग गाठता येणार आहे. त्यामुळे त्यांना अनेक सोई-सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी गावकऱ्यांनी मागणी देखील केली. प्रत्येक निवडणुकीत लोकप्रतिनिधी येतात. आश्वासने देतात. मात्र, त्यानंतर गावाकडे कुणीही फिरकत नाही. बाळासाहेब थोरातांचा तालुका आणि आमदार वैभव पिचड यांचा मतदारसंघ असताना या भागातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

लोकसभा निवडणुकीवरही टाकला होता बहिष्कार -
गावात मुलभूत सुविधा नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. मात्र, त्यावेळी त्यांना फक्त आश्वासने मिळाली. त्यानंतर गावात कुणीही आले नाही. लोकसभेनंतर देखील गावाची स्थिती जैसे थे आहे. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्यण ग्रामस्थांनी घेतला आहे. आता विधानसभेच्या तोंडावर तरी भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार महोदय या गावाकडे लक्ष देतील का? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_राज्यात निवडणुकांचे पडघम वाजु लागले आहेत राजकीय नेते विकासाचा दावा करताय मात्र अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदार संघात असलेल्या डोंगराळ भागातील पेमरेवाडीच्या ग्रामस्थांनी गावाकडे येणारा रस्ता पक्का करुन मिळावा ही मागणी पुर्ण होत नसल्याने आता आपला लोकशाहीतील मतदानाचा हक्कच न बजावण्याचा निर्णय घेतलाय....

VO_अहमदनगर जिल्ह्यातील पेमरेवाडी हे गाव तस संगमनेर तालुक्यात शासकीष कामाकाज संगमनेरात मात्र त्याचा आमदार तालुक्याच्या शेजारीच असलेल्या अकोलेचा अर्थात संगमनेर तालुक्यातील काही गावे ही अकोले मतदार संघात जोडली गेल्याने विकास कामे होतांना आपण जणु दोन देशांच्या सिमेवर आहोत की काय याचा अनुभव सध्या या ग्रामस्थांना येतोय. संगमनेर तालुक्यापासून ४५ किलोमीटरवर असलेल्या भोजदरी गावा अंतर्गत पेमरेवाडी असून या वाडीची लोकसंख्या जवळपास तीनशे ते चारशे आहे. पेमरेवाडी अकोले विधानसभा मतदारसंघात येते. माजी मंत्री मधुकर पिचड आणि आता आमदार वैभव पिचड या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. स्वतंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही अतिदुर्गम, उंच डोंगरावर असलेली पेमरेवाडी आजही विकासापासून कोसोदूर आहे. रस्ते, पाणी या मूलभूत गरजा पुर्णता पुरविल्या गेलेल्या नाहीत गावाला जाण्यासाठी बोटा ते पेमरेवाडी हे पंधरा ते वीस किलोमीटरचा वळसा घालुण जावे लागते त्यातही रसत्याच डांबरीकरण झालेल नसल्याणे चिखल्तुन कसरत करावी लागते हा रस्ता दुरुस्त करुन मिळावा तसेच गावा पासुन अव़घ्या पाच किलो मिटर अंतरावरुन आता नाशिक पुणे महामार्ग देल्याने हा रस्ता करुन मिळावा अशी मागणी ग्रामस्थ करतायेत....

VO_ गेल्या अनेक वर्षा पासुन रसत्याची दुरावस्था आणि गावाला वळसा घालुन जाव लागत असल्याने ग्रामस्थांनी संतप्त व्यक्त करत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातल्याने येथे शुन्य टक्के मतदान झाल होत मात्र त्या नंतरही या ग्रामस्था़च्या मागणी कडे दुर्लक्ष केल जात असल्याने आता विधानसभा निवडणुकीच्या मतदानावरही बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामल्थांनी घेतलाय...प्रत्येक निवडणुकीत राज्यकर्ते येवुन आश्वासन देतात त्या नंतर मात्र कोणी फिरकत नाही बाळासाहेब थोरांताचा तालुका तर आमदार वैभव पिचड दोन्ही मोठे नेते मात्र पठार भागातील अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबीत असतांना प्रश्न सुटत नाहीये....
Body:mh_ahm_shirdi_voting boycott_ special pkg_21_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_voting boycott_ special pkg_21_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.