ETV Bharat / state

लुटमार करण्याच्या हेतूने चारचाकीतून आलेल्या चौघांचा सराफावर गोळीबार

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी शिवारातील साईकृपा ज्वेलर्सच्या मालकावर चार हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यात शेजारच्या रस्त्यावरुन जाणारा एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

author img

By

Published : Feb 6, 2020, 2:31 AM IST

कारवर हल्ला
ज्वेलर्सच्या मालकावर चार चोरांचा गोळीबार

अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी शिवारातील साईकृपा ज्वेलर्सच्या मालकावर चार हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यांच्या जवळील मुद्देमाल लुबाडून धुम ठोकत असताना हल्लेखोरांनी हा गोळीबार केला. या गोळीबारात संगमनेर-नाशिक रस्त्याने मोटारसायकलवरून जाणाऱ्या अविनाश वर्मा यांना गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा... मलबार हिल येथील लॅसपालमास इमारतीला आग; आठ जणांची सुखरुप सुटका

हल्ला केल्यानंतर हल्लेखोर नाशिकच्या दिशेने पसार झाले. तर या हल्ल्यात सराफ ज्ञानेश्वर चिंतामणी हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी तरुण आणि ज्ञानेश्वर चिंतामणी यांच्यावर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना घुलेवाडी शिवारातील आदर्शनगर येथे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. ज्या सराफावर हल्ला झाला त्यांच्यावर हल्ला होण्याची ही दूसरी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा... 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका बंद होणार नाही, सोशल मीडियावरील अफवा खोट्या

Intro:

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी शिवारातील साईकृपा ज्वेलर्सच्या मालकावर चौघे हल्लेखोरांनी हल्ला केला असून मुद्देमाल लुबाडून धुम ठोकत असतांना हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे...या गोळीबारात संगमनेर नाशिक रस्त्याने जाणार्‍या मोेटारसायकलवरील
अविनाश वर्मा या तरुणाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून हल्लेखोर नाशिकच्या दिशेने पसार झाले आहे...तर सुवर्णकार ज्ञानेश्वर चिंतामणी किरकोळ जखमी झाले असून या दोघांन वर संगमनेर येथील खाजगी रुग्णलयात उपचार सुरु आहे....ही घटना घुलेवाडी शिवारातील आदर्शनगर येथे काल सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास घडली.सदर तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे तर सदर सराफावर हल्ला झाल्याची ही दूसरी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे....

Body:mh_ahm_shirdi_fayring_6_photo_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_fayring_6_photo_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.