ETV Bharat / state

अहमदनगर पालिकेच्या इतिहासात महापौर-उपमहापौर निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध, काँग्रेस बेदखल

महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन उमेदवारांच्या विरोधात कोणीही उमेदवारी अर्ज भरले नाहीत. त्यामुळे बुधवारी (30 जून) या दोन्ही पदांसाठी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत शेंडगे व भोसले यांच्या नावाच्या अधिकृत घोषणेची औपचारिकता राहिली आहे.

Ahmednagar Municipality
Ahmednagar Municipality
author img

By

Published : Jun 29, 2021, 7:01 PM IST

Updated : Jun 29, 2021, 7:15 PM IST

अहमदनगर - महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन उमेदवारांच्या विरोधात कोणीही उमेदवारी अर्ज भरले नाहीत. त्यामुळे बुधवारी (30 जून) या दोन्ही पदांसाठी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत शेंडगे व भोसले यांच्या नावाच्या अधिकृत घोषणेची औपचारिकता राहिली आहे. काँग्रेस पक्षाकडून नगरसेविका शीला दीप चव्हाण यांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठीच अर्ज नेले होत, मात्र आज अखेरच्या दिवशी हे अर्ज दाखल झालेच नाहीl. दीप चव्हाण हे काँग्रेसला संधी मिळावी म्हणून मुंबईत तळ ठोकून होते, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही असेच म्हणावे लागेल.

मनपा इतिहासात दोन्ही पदे प्रथमच बिनविरोध -

महापौरपदासाठी शिवसेना उमेदवार रोहिणी शेंडगे यांचा अर्ज सोमवारी (28 जून) दाखल झाला आहे. त्यानंतर उपमहापौर पदाच्या निवडणुकीकरता आज मंगळवारी महाविकास आघाडीच्या वतीने उपमहापौर पदासाठी गणेश भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान महापौर व उपमहापौर पदाकरता प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. उद्या अधिकृत घोषणा केली जाणार आहे. आजच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसचे 4 नगरसेवक सुद्धा यावेळी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यादा महापौर व उपमहापौर पदाची निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज न आल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. अर्थात ही तिसरी बिनविरोध निवडणूक आहे. याआधी 2012 मध्ये शिवसेनेच्या शीला शिंदे यांच्या विरोधात काँग्रेसच्या सुवर्णा कोतकर यांनी दाखल केलेला अर्ज मतदाना आधी मागे घेतल्याने शिंदे बिनविरोध महापौर झाल्या, तर 2016 मध्ये सेनेच्या सुरेखा कदम यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेल्या भाजप उमेदवार नंदा साठे यांनी माघार घेतल्याने कदम बिनविरोध महापौर झाल्या. 2021 मध्ये म्हणजे आता विरोधकांचे अर्जच न आल्याने शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमहापौर सुद्धा बिनविरोध झाला आहे. अधिकृत घोषणा उद्या केली जाणार आहे.

नगरमध्ये महापौर-उपमहापौर निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध
पक्ष निरीक्षक अंकुश काकडे उपस्थित -

भोसले यांनी 3 उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष माणिक विधाते, विनीत पाऊलबुद्धे, संजय शेंडगे, संजय चोपडा, सुभाष लोंढे, दत्ता कावरे, नगरसेवक गणेश कवडे, कुमार वाकळे, अजिंक्य बोरकर, श्याम नळकांडे, जहागीरदार, सागर बोरुडे, सुनील त्र्यंबके, दीपक सूळ, बाळासाहेब पवार, धनंजय जाधव, निखिल वारे, फारूक शेख, उबेद शेख, प्रशांत गायकवाड, सचिन जाधव, मुद्दारसर शेख, प्रकाश भागानगरे, चैतन गुंदेचा, समद खान, जॉन लोखंडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर स्थनिक स्वराज्य संस्थामध्ये एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय आघाडीच्या नेत्यांनी घेतलेला होता. त्यानुसार आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या निवडणुका पार पाडत आहोत. नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने महापौरपदासाठी शेंडगे यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केलेला होता, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपमहापौरपदासाठी गणेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचेही त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर सर्वांनी आम्हाला साथ दिली त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध झाली आहे असेही ते म्हणाले. राज्यामध्ये आगामी काळात सुद्धा महाविकासआघाडी अशा पद्धतीने निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीची सत्ता महापालिकेत स्थापन झाल्यामुळे आता राज्य सरकारच्या माध्यमातून विकास कामांसाठी भरीव असे योगदान मिळेल, त्यासाठी स्थानिक पातळीवर आमदार व लोकप्रतिनिधी निश्चितपणे मदत करतील असेही ते म्हणाले. नगरमध्ये भारतीय जनता पार्टीने सुद्धा एक प्रकारे उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला, विरोधासाठी विरोध केला नाही असेही काकडे म्हणाले.

नगर शहर हरित नगरचा नारा -

यावेळी बोलताना गणेश भोसले म्हणाले की महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला उमेदवारी देण्यात आलेली आहे, मला शिवसेनेसह सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी साथ दिली व ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत असून आता उपमहापौर पदाच्या माध्यमातून नगर शहरातील विकासाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवले जाणार असल्याचेही ते म्हणाले. नगर शहर हरित नगर करण्याचा तसेच शहरात वृक्ष गणना करण्यास प्राधान्य देणार आहे.

काँग्रेसचे चार नगरसेवक उपस्थित -

महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचे पाच नगरसेवक आहेत. त्यापैकी चार नगरसेवक उपस्थित होते, तर महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या शीला दीप चव्हाण मात्र अनुपस्थित होत्या. यावेळी बोलताना काँग्रेस नगरसेवक निखिल वारे यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून महानगरपालिके बाबत वरिष्ठ पातळीवर घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी अनेक निवडणुकात घोडेबाजार होऊन नगरसेवकांची प्रतिमा मलिन झाली होती. मात्र काँग्रेस पक्षाने शहर विकासाला प्राधान्य देत हा घोडेबाजार थांबवला आहे. शहराच्या विकास कामात काँग्रेस पक्ष सेना-राष्ट्रवादी सोबत असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. महापौर पदासाठी आग्रही असलेल काँग्रेसचे स्थानिक जेष्ठ नेते दीप चव्हाण मात्र अनुपस्थित होते. त्यांनी मुंबईत तळ ठोकून बाळासाहेब थोरात आदी नेत्यांकडून प्रयत्न सुरू ठेवले होते, मात्र त्यात त्यांना यश आले नाही.

Last Updated : Jun 29, 2021, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.