ETV Bharat / state

First Private Train : पहिली खासगी रेल्वे पोहोचली शिर्डीत, स्टेशनवर करण्यात आले स्वागत

author img

By

Published : Jun 16, 2022, 3:32 PM IST

भारत गौरव योजनेअंतर्गत खासगी आणि पर्यटन कंपन्यांना रेल्वेकडून भाडेतत्वावर गाड्या देण्यात आल्या आहे. त्यानुसार MNC कंपनीने ही गाडी भाडेतत्त्वावर घेतलेली. पहिली खासगी ट्रेन ही कोईम्बतूर ते साईनगर शिर्डी या मार्गावर धावली. मंगळवारी कोईम्बतूर येथून निघालेली खासगी सेवा प्रणालीतील साई सदन एक्सप्रेस दोन दिवसांच्या प्रवासानंतर सुमारे 820 साईभक्तांना घेऊन शिर्डीच्या साईनगर रेल्वे स्थानकावर पहाटे 6 वाजेच्या सुमारास दाखल झाली. ( First Private Train sai sadan express )

First Private Train
पहिली खासगी रेल्वे पोहोचली शिर्डीत

शिर्डी (अहमदनगर) - भारत गौरव या योजनेअंतर्गत पहिली खासगी रेल्वेगाडी ( First Private Train ) धावली. तिचे उद्घाटन कोईम्बतूर येथे करण्यात आले. ही पहिली खासगी रेल्वे कोईम्बतूर ते शिर्डी या दरम्यान धावली आहे. साऊथ स्टार असे नाव देण्यात आलेली ही गाडी पहाटे शिर्डीमध्ये दाखल झाली.

प्रतिक्रिया

साईनगर स्थानकावर ढोलताश्यांच्या गजरात स्वागत - भारत गौरव योजनेअंतर्गत खासगी आणि पर्यटन कंपन्यांना रेल्वेकडून भाडेतत्वावर गाड्या देण्यात आल्या आहे. त्यानुसार MNC कंपनीने ही गाडी भाडेतत्त्वावर घेतलेली. पहिली खासगी ट्रेन ही कोईम्बतूर ते साईनगर शिर्डी या मार्गावर धावली. मंगळवारी कोईम्बतूर येथून निघालेली खासगी सेवा प्रणालीतील साई सदन एक्सप्रेस दोन दिवसांच्या प्रवासानंतर सुमारे 820 साईभक्तांना घेऊन शिर्डीच्या साईनगर रेल्वे स्थानकावर पहाटे 6 वाजेच्या सुमारास दाखल झाली. यावेळी साईनगर स्थानकावर रेल्वेगाडीचे ढोलताश्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. साई सदन एक्सप्रेस ही कोईम्बतूर येथून निघाल्यानंतर तिला मंत्रालयम या ठिकाणी पाच तासाचा थांबा देण्यात आला होता. या रेल्वेने शिर्डीत आलेल्या प्रवाशांनी शिर्डीला थेट सेवा आणि तीही चांगल्या दर्जाची सेवा मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.

First Private Train
प्रवाश्यांचे साईनगर रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांचे स्वागत

एक तास पूर्वीच पोहचली रेल्वे - शिर्डीत रेल्वे पोहोचल्यानंतर इंजिन ड्रायव्हरचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर या रेल्वेने आलेल्या साईभक्तांना साईच्या दर्शनाची व्हीआयपी सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली. सुमारे 1700 किलोमीटरचा लांबपल्याचा प्रवास या गाडीने केला. निर्धारित केलेल्या वेळेच्या एक तास आधीच ही पहिली खाजगी रेल्वे शिर्डीत पोहचली होती. ही रेल्वे दर मंगळवारी कोईम्बतूर निघून गुरुवारी यापुढे कायम येणार आहे. शुक्रवारी शिर्डीतून निघून रविवारी कोईम्बतूरला पोहचणार आहे.

हेही वाचा - 10th Exam Result : दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार, 'येथे' पाहा निकाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.