शिर्डी (अहमदनगर) - संपूर्ण देशात कोरोनाचे वाढते संकट पाहता लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, दोन महिन्यांनंतर देशात हळुहळू विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. याच पार्श्वभूमीवर हैदराबाद ते शिर्डी पहिले विमान सोमवारी संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखरुप लँड झाले आहे.
हैदराबाद येथून शिर्डी विमानतळावर उतरलेल्या सर्व प्रवाशांना सॅनिटायझर पुरविण्यात आले. त्यांच्या बॅगा आणि इतर सामानाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
या विमानातून तब्बल 41 प्रवाशांचे आगमन झाले. त्यात दोन बालकांचा समावेश आहे. ते नाशिक औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत
गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊनमुळे हैदराबाद येथे शिर्डी आणि परिसरातील वास्तव्य करणारे हे प्रवासी अडकून पडले होते. या विमानाच्या माध्यमातून ते घरी परतले आहेत.
तर हैदराबाद येथे जावू इच्छिणारे 28 प्रवासी शिर्डी येथून विमान हैदराबादकडे रवाना झाले असल्याची माहिती टर्मिनल व्यवस्थापक मुरली कृष्णा यांनी दिली आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहाताचे तहसीलदार कुंदन हिरे, कोपरगांवचे तहसीलदार योगेश चंद्रे आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
#लॉकडाऊन भारत : हैदराबादवरुन पहिले विमान शिर्डीत लँड - Hyderabad shirdi plane lockdown