अहमदनगर: भाजप, काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षव्यापी मंथन शिबिर नगर जिल्ह्यातील साईंच्या शिर्डी नगरीत पार पडत आहे. शुक्रवार, शनिवार असे 2 दिवस शिर्डीतील साई पालखी निवारा या ठिकाणी पार पडत आहे. NCP Manthan Shibir मंथन शिबिर, वेध भविष्याचा हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू असलेल्या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पहिल्या फळीतील सर्व दिग्गज नेते, राज्यातील पक्षाचे आमदार, माजी मंत्री, जिल्हा, शहर, तालुका अध्यक्ष असे जवळपास 2 हजार पदाधिकारी उपस्थित आहेत.
पदाधिकाऱ्यांत नाराजीची भावना मात्र इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मात्र निमंत्रण देण्यात आलेले नसून शिबिराच्या प्रवेशिका असणाऱ्यांनाचं नोंदणी करून प्रवेश आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे महत्वाचे शिबिर नगर जिल्ह्यात होत असताना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीतील सदस्य, सामान्य पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रण आणि प्रवेशिका नसल्याने या पदाधिकाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. याबाबतची नाराजी थेट उघडपणे नसली, तरी खाजगीत पदाधिकारी बोलू लागले आहेत. अनेकांनी याबाबत माध्यमकर्मींना आपले गार्हाणे मांडून आपल्याच जिल्ह्यात राज्यव्यापी पक्षाचे शिबिर होत असताना किमान जिल्हा कार्यकारिणीतील सर्वांनाच निमंत्रण नसल्याने स्थानिक पातळीवर विचारणा होत असल्याने कुचंबणा होत असल्याचे 'दुःख' व्यक्त केले आहे.
जिल्ह्यात 6 आमदार राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्यात शिबिर होत असताना आणि तुम्ही पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य असताना गावातच कसे असे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना कसे उत्तर द्यायचे, याचा विचार पक्षाने करायला हवा होता, अशी भावना कार्यकर्त्यांत आहे. जिल्ह्यात 6 आमदार राष्ट्रवादी पक्षाचे निवडून आले आहे. इतर मतदारसंघात पक्षाची चांगली बांधणी करण्याचे काम सामान्य पदाधिकारी करत आहेत, असे असताना किमान नगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकारिणी सदस्यांना निमंत्रण द्यायला हवे होते, अशाने आमचे हसू झाले, अशी खंतही व्यक्त होत आहे.