ETV Bharat / state

बाप नव्हे हा तर हैवान; पोटच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करून केला खून - बापाचा मुलीवर बलात्कार राहुरी अहमदनगर

नराधम बापाने स्वत:च्याच साडेचार वर्षांच्या बालिकेसोबत अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवले. तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर विहिरीत ढकलून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने मुलीच्या अपहरणाचा बनाव करून राहुरी पोलीस ठाण्यात शनिवारी (ता. १३) रात्री तक्रार दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

राहुरी
राहुरी
author img

By

Published : Feb 17, 2021, 4:45 PM IST

Updated : Feb 17, 2021, 5:02 PM IST

राहुरी (अहमदनगर) - तालुक्यातील एका गावात ऊस तोडणीसाठी आलेल्या नराधम बापाने स्वत:च्याच साडेचार वर्षांच्या बालिकेसोबत अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवले. तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर विहिरीत ढकलून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शुक्रवारी (दि.१२) रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान आरोपीने दुष्कृत्य केले. ते लपविण्यासाठी त्याने मुलीच्या अपहरणाचा बनाव करून राहुरी पोलीस ठाण्यात शनिवारी (ता. १३) रात्री तक्रार दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता. १४) सकाळपासून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी राहुरीचे आठ पोलीस कर्मचारी, नगरच्या दंगल नियंत्रक पथकाचे वीस कर्मचारी आणि श्वान पथकासह दिवसभर शोधकार्य करून ब्राह्मणी परिसरात पिंजून काढला. परंतु, मुलीचा शोध लागला नाही.

रात्री अकरा वाजता एकटाच घरी परतला

काल (दि.१६) सकाळी नऊ वाजता घटनास्थळापासून एक हजार फुटावर असलेल्या विहिरीत पीडित बालिकेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. दरम्यान, तक्रारदार बापाचे संशयास्पद वागणे-बोलणे पोलिसांच्या नजरेतून सुटले नाही. महिला पोलिसांनी मृत बालिकेच्या आईला विश्वासात घेऊन, चौकशी केली. त्यात घटनेपूर्वी नवऱ्याने कडाक्याचे भांडण केले. रात्री साडेदहा वाजता मुलीला घेऊन नवरा घराबाहेर पडला. रात्री अकरा वाजता एकटाच घरी परतला. मुलगी कुठे आहे, असे विचारल्यावर शोधायला लागला, असे पीडित बालिकेच्या आईने सांगितले. त्यामुळे मुलीच्या बरोबर असलेला शेवटचा व्यक्ती म्हणून पोलिसांनी बापाला काल रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, बालिकेचा मृतदेह नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला. त्याचा अहवाल आज पोलिसांना मिळाल्यावर कारवाई करण्यात आली.

मृत बालिकेवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे उत्तरीय तपासणीच्या अहवालात म्हटले आहे. व्हिसेरा राखून ठेवला आहे. घटनेच्या दिवशी व वेळी मृत बालिकेच्या बरोबर शेवटची व्यक्ती तिचा बाप होता. त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली आहे.

Last Updated : Feb 17, 2021, 5:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.