ETV Bharat / state

धक्कादायक! उसने पैसे बुडवण्यासाठी वडिलांनी पोटच्या पोराचा गळा चिरला

मुळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील हिरेनगर येथे राहणारा श्रावण बाळनाथ आहिरे (वय-40) हा आपल्या कुटुंबासह श्रीरामपुर येथील एमआयडीसीतील प्लॉट नंबर बी.4/2 च्या उत्तरेकडील मोकळ्या जागेत मेंढ्या घेऊन राहत होता. त्याने त्याचा मालक संतोष गोराणे यांच्याकडून उचल म्हणून अडीच लाख रुपय घेतले होते.

father killed his son in shrirampur ahmednagar
उसने पैसे बुडवण्यासाठी पिताने केला आपल्या पोटच्या मुलाचा खून
author img

By

Published : Sep 4, 2021, 6:12 PM IST

Updated : Sep 4, 2021, 7:37 PM IST

श्रीरामपुर (अहमदनगर) - शहरातील एमआयडीसी परीसरात एका प्लाटमध्ये राहत असलेल्या मेंढपाळ श्रावण अहिरे याने आपल्या मालकाकडून उसणे घेतलेले अडीच लाख रुपये बुडवता यावे म्हणून त्याने स्वतःच्याच दहा महिन्यांच्या चिमुकल्या मुलाची पहाटे झोपेत गळा दाबून हत्या केल्याच उघड झाल आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खूनी पित्यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस अधिकारी सानप हे माहिती देताना

संपूर्ण प्रकरण काय?

मुळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील हिरेनगर येथे राहणारा श्रावण बाळनाथ आहिरे (वय-40) हा आपल्या कुटुंबासह श्रीरामपुर येथील एमआयडीसीतील प्लॉट नंबर बी.4/2 च्या उत्तरेकडील मोकळ्या जागेत मेंढ्या घेऊन राहत होता. त्याने त्याचा मालक संतोष गोराणे यांच्याकडून उचल म्हणून अडीच लाख रुपय घेतले होते. मालकाचे अडीच लाख रुपये बुडविता यावे म्हणून श्रावण बाळनाथ आहिरे याने त्याचा चिमुकला मुलगा सोपान श्रावण अहिरे (वय 10 महिने) याचा पहाटेच्या सुमारास सगळेजण झोपेत असताना गळा दाबून खुन केला आहे. त्यानंतर श्रावण अहिरे यांनी आपल्याला नातेवाईक यांना संपर्क करून सांगितले की माझे मालक यांनी माझा मुलाच्या गळ्यावरुन गाडी घालून हत्या केली आहे.

हेही वाचा - Money Laundering Case : संजीव पालांडे यांची मुंबई हायकोर्टात धाव!

या घटनेची माहिती श्रीरामपुर शहर पोलिसांना मिळाल्या नंतर घटनास्थळी येवून पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालकाकडून उसने घेतलेले पैसे बुडावे म्हणून आपल्या पोटच्या मुलाची खुन करून मालकाचे नाव गुतावण्याचे प्रयत्न आरोपी श्रावण अहिरे यांनी केला आहे. दरम्यान, मृत मुलाची आई सिताबाई श्रावण आहिरे (वय-35) हिने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 1-1.591/2021 प्रमाणे श्रावण बाळनाथ आहिरे याचे विरुध्द भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ सुरवाडे करत आहेत.

Last Updated : Sep 4, 2021, 7:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.