ETV Bharat / state

Kopargoan Fashion Show  : कोपरगावात असाही रॅम्पवॉक; एकल महिलांसाठी अनोखी फॅशन शो स्पर्धा..

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान सामाजिक संस्था, डॉ. ए जी फिल्म प्रोडक्शन आणि स्टारडम इंडिया या संस्थेच्या वतीने एकल महिलांसाठी हिरकणी महाराष्ट्राची ही फॅशन शो स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत अकोले येथील सुरेखा पुंजा मंडलिक या प्रथम विजेत्या ठरल्या आहेत.

Kopargoan Fashion Show Competition
फॅशन शो स्पर्धा
author img

By

Published : Mar 13, 2023, 7:25 PM IST

फॅशन शोमध्ये सहभागी झालेल्या महिला प्रतिक्रिया देताना

अहमदनगर : आजवर आपण अनेक फॅशन शो पाहिले असेल विविध मॉडेलला रॅम्प वॉक करताना बघितलं असेल. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात आयोजीत एका अनोख्या फॅशन शो मध्ये चक्क एकल महिला रॅम्प वॉक करताना दिसल्या. या अनोख्या फॅशन शो स्पर्धेची सर्वत्र चर्चा होत आहे. या स्पर्धेत एकच महिलांबरोबरच राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी देखील रॅम्प वॉक केले. या अनोख्या स्पर्धेचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

फॅशन शो स्पर्धेचे आयोजन : कोपरगाव येथील सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान सामाजिक संस्था, डॉ. ए जी फिल्म प्रोडक्शन आणि स्टारडम इंडिया या संस्थेच्या वतीने एकल महिलांसाठी हिरकणी महाराष्ट्राची ही फॅशन शो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अकोले येथील सुरेखा पुंजा मंडलिक या प्रथम विजेत्या ठरल्या आहे. तर कोपरगाव येथील रश्मी शिवनारायण शर्मा द्वितीय आणि बारामती येथील अश्विनी तावरे तृतीय क्रमांकाचे विजेते ठरल्या आहे.

यासाठी स्पर्धेचे आयोजन : देशात विधवा महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांना मान सन्मानापासून बाजूला ठेवले जाते. विधवा प्रथा बंद व्हावी व त्या महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी कायदा झाला तरी आजही समाजातील काही घटक विधवांना दुय्यमस्थानीच ठेवतात. परंतु सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानने घटस्फोटीत परितक्त्या आणि विधवा महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्यामधील प्रतिभाशक्ती जागृत करण्यासाठी फॅशन शो स्पर्धा आयोजित केली होती. या अनोख्या स्पर्धेत 60 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदवला.

आम्ही कलागुण सादर करू शकलो : आम्हाला आयोजकांच्या वतीने सन्मानाची वागणूक देत आमच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि या स्पर्धेत आम्ही आमच्यातील कलागुण सादर करू शकलो. या स्पर्धेची विजेती ठरल्याने मला खूप आनंद होत असल्याचे स्पर्धेतील प्रथम विजेत्या सुरेखा मंडलिक यांनी म्हटले आहे.

यांच्यातर्फे आयोजन : कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. छाया शिंदे होत्या प्रमुख अतिथी म्हणून राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्ष रूपवते, स्वाती कोयटे एकल महिला पुनर्वसन समिती अकोलेचे प्रतिभा हेरंब कुलकर्णी उपस्थित होते. स्टार ड्रम इंडियाचे डॉ.अशोक गावितत्रे एस के फूड कंपनीच्या श्रद्धा शिंदे, प्राध्यापक अनिकेत ढमाले, सुनिता ससाने, सुधा भाभी ठोळे या सर्वांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा : Raksha Married With Idol : 31 वर्षांची रक्षा सोलंकी कान्हासाठी झाली वेडी, श्रीकृष्णाच्या मूर्तीशी केला विवाह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.