ETV Bharat / state

परदेशातील पिकांच्या लागवडीतून शेतकरी कमावतो लाखोंचा नफा - nevasa agro news

अहमदनगरमधील नेवासामधील सोमेश्वर लवांडे या युवा शेतकऱ्याने बांगलादेशी,थायलंड,ऑस्ट्रेलियन, इंडोनेशियन या चार पिकांची माहिती मिळवली. हेच पीक आपल्याकडील पारंपरिक गिनी आणि इतर चारा पिकांना फाटा देईल, हे लक्षात घेत चार विदेशी आणि सात भारतीय नेपियर जातीच्या चाऱ्याची तीन वर्षापूर्वी लागवड केली होती. आज हाच चारा शेती व्यवसायातून तब्बल 25 लाख रूपयांचा नफा मिळावला असल्याच सोमेश्वर लवांडे यांनी सांगितले आहे.

special story
special story
author img

By

Published : Jun 22, 2021, 7:29 AM IST

नेवासा (अहमदनगर) - नेवासा तालुक्यातील फत्तेपूर गावातील सोमेश्वर लवांडे या युवा शेतकऱ्याने आपल्या शेती व्यवसायात वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन पिकांचा शोध सुरु केला.

परदेशी चारा

बांगलादेशी,थायलंड,ऑस्ट्रेलियन, इंडोनेशियन या चार पिकांची माहिती मिळाली. हेच पीक आपल्याकडील पारंपरिक गिनी आणि इतर चारा पिकांना फाटा देईल, हे लक्षात घेत चार विदेशी आणि सात भारतीय नेपियर जातीच्या चाऱ्याची तीन वर्षा पूर्वी लागवड केली होती. आज हाच चारा शेती व्यवसायातून तब्बल 25 लाख रूपयांचा नफा मिळवून देत असल्याचे सोमेश्वर लवांडे यांनी सांगितले आहे.

शेतकरी कमावतो लाखोंचा नफा
शेतकरी कमावतो लाखोंचा नफा
परदेशी वाणाची केली पेरणी

राज्यातील अनेक युवा शेतकरी आपल्या शेतीत नव नवीन प्रयोग करत आहे. त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील फत्तेपूर येथील सोमेश्वर लवांडे हा तरुण शेतकरी जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण आणि दोनच एकर शेती आहे. त्यांनी तीन वर्षाच्या कष्टानंतर चारा उद्योगात मोठे यश मिळवले आहे. इतकंच नव्हे तर इतर शेतकर्‍यांनाही शाश्वत उत्पन्न मिळवून दिलं आहे. सोमेश्वर लवांडे यांनी आपल्या केवळ एक एकर क्षेत्रात बांग्लादेशीय,थायलंड,ऑस्ट्रेलियन, इंडोनेशियन या परदेशी जातीच्या चार वाणांची लागवड केली आहे. तसेच स्वदेशी सात नेपियर जातीच्या चार्‍याची लागवड केली आहे. कमी वेळेत अधिक उत्पादन आणि दूधासाठी सकस असलेला हा चारा दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या पसंतीस उतरला आहे.

अशी केली लागवड

सोमेश्वरने सुरुवातीला थायलंड वरुन आणलेल्या 4 जी बुलेट सुपर नेपियर या जातीचे चारा बियाणे आणून एक गुंठा क्षेत्रात त्याची लागवड केली. 2.5 ते 3 महिन्यात हे मोठे झाल्यानंतर याचे बियाणे तोडून पुन्हा वाढीव क्षेत्रात त्याची 3 फूट बाय 1 फूट अंतरावर लागवड केली. हे लागवडीचे क्षेत्र वाढवत नेऊन आज 2 एकर क्षेत्रात सुपर नेपियर जातीचे चारा पीक उभे आहे. अनेक अडथळे, नुकसान सोसल्यानंतर लवांडे यांचा हा चारा प्रयोग चांगलाच यशस्वी ठरला आहे. लॉकडाऊनच्या काळात इतर शेतकर्‍यांना चारा विकून पास पंचवीस लाखाचा नफा कमावल्याचे सोमेश्वर लवांडे यांनी सांगितले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना महागडा चारा विकत घेऊन दूध धंदा करावा लागतो. मात्र त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी शेतकऱ्यांची अवस्था होते. मकाच्या पिकावर लष्करी अळीचं संकट बघता चारा घटल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे लवांडे यांनी केलेला हा विदेशी चारा दूध धंद्यासाठी वरदान ठरत आहे. अनेक शेतकरी लवांडे यांच्याकडे बियाणे खरेदीसाठी संपर्क साधत आहेत. आसपासच्या शेतकऱ्यांशी करार करत लवांडे यांनी इतर शेतकऱ्यांना देखील आर्थिक पाठबळ मिळून दिले आहे. गावातील अनेक शेतकरी या चारा उद्योगात उतरले आहेत. कमी पाणी, तात्काळ उत्पादन आणि शेतकऱ्यांची मागणी यामुळे गावात चारा उद्योग बहरला आहे.

पिकाची वैशिष्ट्ये
पिकाची वाढ - 18 ते 20 फूट, सर्वात जास्त प्रथिने - (15 ते 18 % ), मुरघास साठी उपयुक्त, एका वर्षाला 3 कापण्या, 5 ते 6 वर्षे चालणारा जलद वाढ होणारा वाण.

लागवड पद्धत
या चारा पिकाची लागवड करण्यासाठी एकरी 12 हजार डोळे लागतात. सरी पद्धतीने 3 फूट बाय 1 फूट अंतरावर एक डोळा पद्धतीने लागवड करावी. एका डोळ्यापासून 40 ते 50 फुटवे निघतात. 2.5 ते 3 महिन्यात चार्‍याची पहिली कापणी होते.

कापणी
दर 3 महिन्यांनी पुढील कापण्या होऊन एका वर्षात 3 कापण्यांमध्ये एक एकरातून किमान तीनशे टन हिरवा चारा उपलब्ध होऊ शकतो.

विदेशी नेपीयर फायद्याचे
पारंपारिक नेपीयर गवताला काटे,कुस,लव असते त्या मुळे शेतकरी वैतागला होता. त्यालाच पर्याय म्हणून विदेशी नेपीयर फायद्याचे ठरते आहे. कारण, त्याला काटे,रुस लव नाही पिके मक्या सारख कसदार आणि चोपडे आहेत.

हेही वाचा - Pawar Politics... शरद पवार- प्रशांत किशोर यांची दिल्लीत भेट, तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांसोबत उद्या दुपारी ४ वाजता बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.