ETV Bharat / state

भीषण दुष्काळातही पारंपरिक शेतीला फाटा; काकडी लागवडीतून शेतकऱ्याने घेतले लाखोंचे उत्पन्न - farm

अरूण कुरकुटे यांची  कुरकुटवाडी येथे वडीलोपार्जीत ३५ एकर शेती आहे. मात्र, पाण्याचे दुर्भीक्ष असल्याने आता करायचे काय? हा प्रश्न अरूणलाही भेडसावत होता. त्यातूनच पॉलीहाऊसमधील रीजवान जातीच्या काकडीची (चायना काकडी)  लागवड करण्याचा निर्णय घेतला कुरकटे यांनी घेतला.

काकडी लागवडीतून शेतकरी अरूण कुरकुटे यांनी लाखोंचे उत्पन्न घेतले आहे.
author img

By

Published : May 5, 2019, 11:25 AM IST

अहमदनगर- संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी येथील तरुण शेतकऱयाने पारंपरिक शेतीला फाटा देत दुष्काळी परिस्थितीतही रिजवान जातीची काकडी लावत लाखो रूपयांचे उत्पादन मिळवले आहे. अरूण कुरकुटे असे शेतकऱयाचे नाव आहे. पाण्याची काटकसर आणि कमी जागेचा वापर करून दुष्काळी परिस्थितीतही लाखोंचे उत्पादन घेता येऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

शेतकरी अरूण कुरकुटे

अरूण कुरकुटे यांची कुरकुटवाडी येथे वडीलोपार्जीत ३५ एकर शेती आहे. मात्र, पाण्याचे दुर्भीक्ष असल्याने आता करायचे काय? हा प्रश्न अरूणलाही भेडसावत होता. त्यातूनच पॉलीहाऊसमधील रीजवान जातीच्या काकडीची (चायना काकडी) लागवड करण्याचा निर्णय घेतला कुरकटे यांनी घेतला. अवघ्या वीस गुंठे क्षेत्रावर सरकारच्या अनदानातून पॉलीहाऊस उभारले आणि रीजवान जातीची काकडी झिगझॅक पद्धतीने लावली. साधारण चार हजार काकडीचे झाड वीस गुंठे क्षेत्रात लावले आहेत. एका झाडाच्या बीयाणासाठी अकरा रूपये खर्च केला. मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, शेणखत यासह तापमान मर्यादीत ठेवण्यासाठी वॉटर फॉगचीही पॉलीहाऊसमध्ये व्यवस्था केली. यासाठी एकूण खर्च एक लाख रुपये झाला.

रीजवान जातीची ही काकडी लावल्यानंतर अवघ्या ३५ व्या दिवशी काकडी काढण्याला सुरूवात झाली. जवळपास दहा फुटापर्यन्त वाढणाऱया या काकडीच्या वेलीला खालपासुन वर पर्यंत काकडी लागलेल्या असतात. या काकडीचा हंगाम साधारण सत्तर दिवसाचा आहे. दिवसाआड काकडीची तोडणी केली असता विस गुंठ्यात हजार अकराशे किलो काकडी मिळते. पारंपारिक काकडीपेक्षा या काकडीला परदेशात जास्त मागणी असल्याने भावही जास्त मिळतो.
अरूणकडे असलेल्या ३५ एकर शेतीतून जेवढे उत्पन्न मिळत नाही तेवढे वीस गुंठे काकडीतून मिळाले आहे. आत्तापर्यंत जवळपास २७ टन काकडी १८ ते वीस रूपयांनी विकली गेली आहे. ज्यातून खर्च वजा जाता पाच लाखांचा नफा शिल्लक राहीला आहे आणि अजूनही दिड लाख रूपये मिळण्याची अरूणला अपेक्षा आहे.

इतर शेतकऱ्यांनी घ्यावा आदर्श

पारंपारिक शेतीपेक्षा या शेतीतून नफाही जास्त आणि खर्चही कमी आहे. इतर शेतकऱ्यांनी देखील हे तंत्रज्ञान स्विकारायला हवे. पॉलीहाऊसचं तंत्रज्ञान उत्तम आहे, मात्र सरकारने जास्त क्षेत्रासाठी अनुदान द्यायला हवे, अशी अपेक्षा अरूणच्या वडीलांनी व्यक्त केली. सध्या राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जर अरूण पाण्याची काटकसर करून कमी जागेत जास्त उत्पन्न घेऊ शकतो तर तुम्हालाही नक्कीच यश मिळेल.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ संगमनेर तालुक्यातील तरूण शेतक-याने पारंपारिक शेतीला फाटा देत दुष्काळी परिस्थितीतही रिजवान जातीची काकडी लावत लाखो रूपयांचे उत्पादन मिळवले आहे.. पाहूयात या तरूणाची प्रेरणादायी कहाणी...

VO_ संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी येथील हा आहे अरूण कुरकुटे... वडीलोपार्जीत 35 एकर शेती आहे .. मात्र पाण्याचं दुर्भीक्ष असल्याने आता करायचं काय ? हा प्रश्न अरूणलाही भेडसावत होता.. त्यातूनच पाॅलीहाऊसमधील रीजवान जातीची ज्या काकडीला चायना काकडीही म्हणटल जातं .. तीची लागवड करण्याचा निर्णय घेतला.. अवघ्या वीस गुंठे क्षेत्रावर सरकारच्या अनदानातून पाॅलीहाऊस उभारले आणी रीजवान जातीची काकडी झिकझ्याक पद्धतीने लावली.. साधारण चार हजार काकडीचे झाड वीस गुंठे क्षेत्रात लावले आहेत .. एका झाडाच्या बीयाणासाठी अकरा रूपये खर्च केला.. मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, शेणखत यासह तापमान मर्यादीत ठेवण्यासाठी वाॅटर फाॅगचीही पाॅलीहाऊस मध्ये व्यवस्था केली.. एकुण खर्च एक लाख रुपये झाला ...

BITE_ अरूण कुरकुटे उत्पादक शेतकरी

VO_ रीजवान जातीची हि काकडी लावल्यानंतर अवघ्या 35 व्या दिवशी काकडी काढण्याला सुरूवात झाली.. जवळपास दहा फुटापर्यन्त वाढणार्या या काकडीच्या वेलीला खालपासुन वर पर्यंत काकडी लगडलेल्या असतात.. साधारण सत्तर दिवसाचा या पिकाचा हंगाम आहे .. दिवसाआड काकडीची तोडणी केली असता विस गुंठ्यात हजार अकराशे किलो काकडी मिळते.. पारंपारिक काकडीपेक्षा या काकडीला परदेशात जास्त मागणी असल्याने भावही जास्त मिळतो..

BITE _ अरूण कुरकुटे उत्पादक शेतकरी

VO_ अरूणकडे असलेल्या 35 एकर शेतीतून जेवढे उत्पन्न मिळत नाही तेवढे वीस गुंठे काकडीतून मिळाले आहे .. आत्तापर्यंत जवळपास 27 टन काकडी 18 ते वीस रूपयांनी विकली गेलीय. . ज्यातून खर्च वजा जाता पाच लाखांचा नफा शिल्लक राहीला आहे आणी अजूनही दिड लाख रूपये मिळण्याची अरूणला अपेक्षा आहे..

BITE _ अरूण कुरकुटे उत्पादक शेतकरी

VO_ पारंपारिक शेतीपेक्षा या शेतीतून नफाही जास्त आणी खर्चही कमी आहे.. इतर शेतक-यांनी देखील हे तंत्रज्ञान स्विकारायला हवे..पाॅलीहाऊसचं तंत्रज्ञान उत्तम आहे मात्र सरकारने जास्त क्षेत्रासाठी अनुदान द्यायला हवं अशी अपेक्षा अरूणच्या वडीलांनी व्यक्त केलीय.....सध्या राज्यात भिषण दुष्काळी परिस्थिती आहे अशा परिस्थितीत जर अरूण पाण्याची काटकसर केली आणी कमी जागेत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हालाही नक्कीच यश मिळेल...

Body:4 April Shirdi Cucumber Farming Conclusion:4 April Shirdi Cucumber Farming
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.