ETV Bharat / state

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही निळवंडे कालव्याचे काम बंद; शेतकरी करणार रास्ता रोको

निळवंडे  प्रकल्पाची पायाभरणी होऊन अठ्ठेचाळीस वर्ष होत आली आहेत. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही या प्रकल्पाचे कालवे शासनाने अद्याप पूर्ण केलेले  नाहीत. त्यामुळे निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे.

शेतकरी
author img

By

Published : May 18, 2019, 11:12 PM IST

अहमदनगर- उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्याचे अकोले तालुक्यातील बंद केलेले काम उच्च न्यायालयाने आदेश देऊनही सुरू झालेले नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी संतप्त झाले आहेत. जलसंपदा विभाग व जिल्हाधिकारी यांनी आगामी २३ मेपर्यंत काम सुरू न केल्यास निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने सोमवार दि .२७ मे रोजी तळेगाव दिघे येथील चौफुलीवर सकाळी नऊ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी काकडी येथे झालेल्या बैठकीत केली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

निळवंडे प्रकल्पाची पायाभरणी होऊन अठ्ठेचाळीस वर्षे होत आली आहेत. तरीही या प्रकल्पाचे कालवे अद्याप पूर्ण केलेले नाहीत. निळवंडे कालवा कृती समितीने राज्य सरकारकडून निधी मिळण्याची आशा मावळल्यावर केंद्रीय जलआयोगाकडे धाव घेतली आणि वेगवर्धित सिंचन प्रकल्पात समावेश करण्यासाठी २०१४ अखेर चौदा मान्यता मिळवल्या. राज्य सरकारने रखडवलेल्या दोन मान्यता मिळवण्यासाठी कालवा कृती समितीचे शेतकरी विक्रांत काले व पत्रकार नानासाहेब जवरे यांनी अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सप्टेंबर २०१६ मध्ये जनहित याचिका दाखल केली आणि केंद्रीय जल आयोगाकडून एक आणि राज्य शासनाने रखडवलेल्या दोन अशा तीन मान्यता मिळवल्या. २६ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद खंडपीठाने निधी देण्याबाबत व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले असून लाभक्षेत्रा बाहेर पाणी पळवापळविलाही स्थगिती दिलेली आहे.

औरंगाबाद खंडपीठाचे न्या. गंगापूरवाला व न्या. अरुण ढवळे यांनी अकोलेतील काम सुरू करण्यास जी काही मदत लागेल ती शासनाने त्वरित उपलब्ध करून, येणारे अडथळे निवारण करून काम चालू करण्याचे आदेश दिले होते. त्याला पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. तरी जलसंपदा विभाग थंडच दिसत आहे. काम चालू करण्यासाठी आवश्यक हालचाल अद्याप सुरू झालेली दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत मोठी अस्वस्थता वाढली आहे. आगामी रणनीती ठरविण्यासाठी काकडी (ता. कोपरगाव) येथील सभागृहात नुकतीच कालवा कृती समितीची बैठक जेष्ठ नेते दत्तात्रय चौधरी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, उपाध्यक्ष संजय गुंजाळ,नानासाहेब गाढवे, गंगाधर रहाणे, आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Intro:
Shirdi_Ravindra Mahale

उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्यांचे अकोले तालुक्यातील बंद केलेले काम उच्च न्यायालयाने आदेश देऊनही सुरु न झाल्याने दुष्काळी शेतकरी संतप्त झाले असून जलसंपदा विभाग व जिल्हाधिकारी यांनी आगामी तेवीस मे पर्यंत काम सुरु न केल्यास निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने आगामी सोमवार दि.२७ मे रोजी तळेगाव दिघे येथील चौफुलीवर सकाळी नऊ वाजता" रास्ता रोको "आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी काकडी येथे झालेल्या बैठकीत केली आहे....

निळवंडे हा प्रकल्पाची पायाभरणी होऊन अठ्ठेचाळीस वर्ष संपत आली आहे.तरीही या प्रकल्पाचे कालवे अद्याप पूर्ण केले नाही.निळवंडे कालवा कृती समितीने निधी मिळण्यासाठी राज्य सरकारकडून आशा मावळल्यावर केंद्रीय जलआयोगाकडे धाव घेऊन वेगवर्धित सिंचन प्रकल्पात समावेश करण्यासाठी २०१४ अखेर चौदा मान्यता मिळवल्या.राज्य सरकारने रखडवलेल्या दोन मान्यता कालवा कृती समितीने कालवा कृती समितीचे शेतकरी विक्रांत काले व पत्रकार नानासाहेब जवरे यांनी अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विधिज्ञ अजित काळे यांच्या मार्फत सप्टेंबर २०१६ मध्ये जनहित याचिका दाखल करून तर केंद्रीय जल आयोगाकडून एक अशा तीन मान्यता मिळवल्या.२६ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद खंडपीठाने निधी देण्याबाबत व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले असून लाभक्षेत्रा बाहेर पाणी पळवापळविलाही स्थगिती दिलेली आहे....

२८ फेब्रुवारीस केंद्र सरकारने २२३२.६२ कोटी रुपयांना मान्यता दिल्याचे इतिवृत्त न्यायालयासमोर सादर केले आहे.दरम्यान राज्य सरकारने गतवर्षी या प्रकल्पासाठी जवळपास अडीचशे कोटी रुपयांचा निधी गोदावरी खोरे महामंडळाकडे उपलब्ध करून दिला आहेे तथापी ही तरतुद होउन अकरा महिन्यांचा कालखंड उलटला आहे कृती समितीने वारंवार मागणी करूनही अकोले तालुक्यातील कालव्यांचे काम निळवंडे धरणाच्या भिंतिपासून ० ते २८ कि.मी. सुरु केलेले नाही. या बाबत कालवा कृती समितीने जलसंपदा विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले आहे .कालवा कृती समितीने जलसंपदा मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊनही उपयोग झाला नाही.तर सत्ताधाऱ्यांनी प्रस्थापितांशी हात मिळवणी केल्याने मोठा अनर्थ निर्माण झाला आहे.त्यामुळे कालवा कृती समितीने मूळ याचिकेत किरकोळ दिवाणी अर्ज खंडपीठपुढे दाखल करून अकोलेतील तेथील लोकप्रतिनिधिने व काही लोकांनी बंद केलेले काम सुरु करण्यासाठी खंडपीठात अर्ज दाखल केला होता.उच्च न्यायालयात जलसंपदा विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता यांनी २६ मार्च रोजी पोलीस बळाचे आदेश दिल्यास आठ दिवसात काम चालू करतो असे प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर सादर केले आहे.व सोळा एप्रिल रोजी सुनावणी ठेवली होती.जलसंपदा विभागाने २५ पोलीस व दहा महिला पोलीस आदींची मागणी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली मात्र त्यांनी त्याकडे शासनाने कानाडोळा केला होता.शुक्रवार दि.३ मे २०१९ रोजी उच्च न्यायालय क्रं.-२ समोर.निळवंडे कालवा कृती समितीचे विधिज्ञ अजित काळे यांनी अकोले तालुक्यातील राजकारणाच्या कचाट्यात अडकलेले काम त्वरित सुरु करण्याची मागणी करून आगामी महिनाभर न्यायालयास सुट्टी व पुढील पावसाळा याकडे न्यायालयाचे लक्ष वेधून शेतकऱ्यांच्या हाल-अपेष्टा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. व या प्रकल्पाची प्रतिदिन आठ ते नऊ लाख रुपयांनी किंमत वाढत आहे.कामास उशीर केल्याने हि जबाबदारी जिल्हाधिकारी व जलसंपदा संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करून त्याची वसुली करावी अशी मागणी हि कृती समितीने केली आहे.औरंगाबाद खंडपीठाचे न्या.गंगापूरवाला व न्या.अरुण ढवळे यांनी अकोलेतील काम सुरु करण्यास जी काही मदत लागेल ती शासनाने त्वरित उपलब्ध करून,येणारे अडथळे निवारण करून काम चालू करण्याचे आदेश दिले होते त्याला पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे तरी जलसंपदा विभाग थंडच दिसत आहे.काम चालू करण्यासाठी आवश्यक हालचाल अद्याप सुरु झालेली दिसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांत मोठी अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे आगामी रणनीती ठरविण्यासाठी काकडी ता.कोपरगाव येथील सभागृहात नुकतीच कालवा कृती समितीची बैठक जेष्ठ नेते दत्तात्रय चौधरी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.....

निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,नानासाहेब गाढवे,गंगाधर रहाणे,विठ्ठलराव पोकळे, रामनाथ बोऱ्हाडे,सोमनाथ लहामंगे,सोन्याबापू उऱ्हे सर,ज्ञानदेव हारदे,तानाजी शिंदे,संतोष तारगे,अशोक गांडूळे,आप्पासाहेब कोल्हे,विठ्ठलराव देशमुख,शशिकांत साब्दे,अमोल साब्दे,शरद साब्दे,कैलास गव्हाणे,रंगनाथ गव्हाणे,रावसाहेब मासाळ,उत्तमराव जोंधळे,अशोक जोंधळे,दत्तात्रय थोरात,गोरक्षनाथ शिंदे,चंद्रकांत थोरात,दगडू रहाणे,चंद्रकांत कार्ले,कांताराम कडलंग,शरद गोर्डे,इस्माईल शेख,विलास भालेराव,भिवराज शिंदे,आबासाहेब सोनवणे,वाल्मीक गाढे,बाळासाहेब सोनवणे,रायभान गुंजाळ,शिवाजी जाधव,दिनेश शेळके,नवनाथ मोटे,माधव चासकर,मुन्नाभाई शेख,सुभाष भालेराव,हौशीराम पाडेकर,शब्बीर सय्यद,चंद्रकांत सोनवणे,रावसाहेब कोल्हे,भाऊसाहेब घुले,उज्वल सरोदे,आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.....Body:MH_AHM_Shirdi Water Andolan Farmer_18 May_MH10010
Conclusion:MH_AHM_Shirdi Water Andolan Farmer_18 May_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.