ETV Bharat / state

बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर ठार, अकोले तालुक्यात भीतीचे वातावरण - बिबट्याचा हल्ल्या

अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील धुमाळवाडी येथे रविवारी मध्यरात्री शेतातील काम उरकून संतोष कारभारी गावडे हा शेतमजूर घरी जात होता. यावेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह हा उसाच्या शेतात पोट फाडुन खाल्याच्या अवस्थेत आढळला आहे. या घटनेमुळे परीसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Farm laborer killed in leopard attack in akole
बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजुर ठार
author img

By

Published : Jul 6, 2021, 7:16 AM IST

Updated : Jul 6, 2021, 8:08 AM IST

अकोले (अहमदनगर) - तालुक्यातील धुमाळवाडी येथे रविवारी 45 वर्षीय शेतमजूरावर बिबट्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात शेतमजूराचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह हा उसाच्या शेतात पोट फाडुन खाल्याच्या अवस्थेत आढळला आहे. यामुळे अकोले तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजुर ठार

अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील धुमाळवाडी, धामणगाव, आवारी आदी गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे शेळ्या, मेढ्यांवर सारखे हल्ले सुरु आहे. ग्रामस्थांनी अनेकदा पिंजरा लावण्याची वनविभागाकडे मागणी केलेली होती. अशातच रविवारी मध्यरात्री धुमाळवाडी शिवारातील धामणगाव आवारीरोड लगत शेतात संतोष कारभारी गावडे हा शेतमजूर काम उरकून घरी जात होता. यावेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह हा उसाच्या शेतात आढळला आहे. दरम्यान सकाळी या घटनेची स्थानिकांना माहिती मिळताच त्यांनी ही माहिती पोलीस व वनविभागाला दिली. वनाधिकारी भाग्यश्री पोले, वनपाल पारधी, पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, सरपंच डॉ. रविंद्र गोर्डे, धामणगाव आवारी, उपसरपंच गणेश पापळ, व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. वन कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठण्यात आला आहे.

Last Updated : Jul 6, 2021, 8:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.