ETV Bharat / state

शिर्डीत विद्युत रोहित्रांची अवस्था बिकट; संभाव्य धोका टाळण्यासाठी दुरुस्तीची मागणी

author img

By

Published : Aug 28, 2019, 7:38 PM IST

शिर्डी शहरात महाराष्ट्र विद्युत वितरणाच्या रोहित्रांचे तीनतेरा वाजले आहेत. साई मंदिर ते नविन पिंपळवाडी रस्त्यावरील साईश कॉर्नर येथे अति गर्दीच्या ठिकाणी असलेल्या विद्युत रोहित्राची अवस्था खुपच बिकट आहे. या रोहित्राची लवकरात-लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

अहमदनगर - शिर्डी शहरात महाराष्ट्र विद्युत वितरणच्या रोहित्रांचे तीन-तेरा वाजले आहेत. साई मंदिर ते नविन पिंपळवाडी रस्त्यावरील साईश कॉर्नर येथे जास्त गर्दीच्या ठिकाणी असलेल्या विद्युत रोहित्रांची अवस्था खूपच बिकट आहे.

या रोहित्राद्वारे शहरातील पिंपळवाडी रोड परिसरात विद्युत पुरवठा केला जातो. या रोहित्रामुळे रहदारी करणाऱ्यांना याचा त्रास होऊ शकतो. याच भागात जिल्हा परिषदेची शाळा असून विद्यार्थी देखील या मार्गाचा वापर करतात. खराब विद्युत रोहित्रामुळे अपघात होऊन विजेचा धक्का ही बसू शकतो. महावितरणचे कर्मचारी विज बिलाचे पैसे घेण्यासाठी वेळेवर येतात. त्यांना हा रोहित्र दिसत नसेल का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. विद्युत रोहित्राची लवकरात-लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

Intro:

ANCHOR_ सबका मालिक एकचा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आज जगभरातून लाख भाविक येत असून येथील रस्त्यांवर भाविकांची नेहमीच गर्दी असते..अशा शहरात महाराष्ट्र विद्युत वितरणाच्या रोहित्रांचे तीनतेरा नऊबारा वाजलेय....

VO_ शिर्डी शहरातील एक अतिशय खराब अवस्थेतील विद्युत रोहित्र साई मंदिर ते नविन पिंपळवाडी रस्त्यावरील साईश कॉर्नर येथे अति गर्दीच्या ठिकाणी आढळून आलाय..या रोहित्राव्दारे शहरातील पिंपळवाडी रोड परिसरात विद्युत प्रवाह होतोय..मात्र याठिकाणची परिस्तीती अतिशय बिकट असून येथून रहदारी करणा-यांना याचा त्रास होवू शकतो...या भागात जिल्हा परिषदेची शाळा असून विद्यार्थी देखील या मार्गाचा वापर करतात..अशा अत्यावस्थ परिस्थीतील विद्युत रोहित्रामुळे एखाद्यावेळी अनर्थ होवून विजेचा धक्का ही बसू शकतो त्यामुळे याची दुरुस्थीती करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करताय....

BITE_ नीलेश कोते_शिर्डी ग्रामस्थ

VO_पिपंळवाडी रस्त्यालगत असलेल्या ह्या विद्युत रोहित्राची दुरावस्था झाल्याने पावसात मोठा अपघात देखील होवू शकतो..महावितरणातील कर्मचारी विज बिलाचे पैसे घेण्यासाठी वेळेवर येतात.त्यांना हा रोहित्र अर्थात डी.पी. दिसत नसेल का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थीत केला जातोय....Body:mh_ahm_shirdi_rohitra problem_28_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_rohitra problem_28_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.