अहमदनगर- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर हे गाव जुन्या पिढीतील गुळाचे मोठे बाजार पेठ असलेले गाव आहे. या गावात खटोड कुटुंबियांच्या घराचे खोदकाम सुरू असताना सापडलेल्या धनाच्या हंड्यात 11 किलो चांदीची व्हिक्टोरीया राणीच्या काळातील जुनी नाणी, शिक्के सापडल्याचे उघड झाल असून श्रीरामपूर तहसीलदारांनी पंचनामाकरून ही सर्व नाणी ताब्यात घेतले आहे.
असा झाला उलगडा
श्रीरामपूर तालुक्यातील इंग्रज कालीन मोठी बाजार पेठ असलेल्या बेलापूर गावात अनेक वाडे आहेत. काळानुरुप वाडे पाडून नविन इमारती उभारल्या जात आहे. गावातील परिसरात असलेल्या राजेश खडोड यांनी आपल्या वडीलोपार्जीत जागेत घराचे बांधकाम सुरू केले होते. या जागेत खोदकाम सुरू असताना वटपोर्णिमेच्या दिवशी येथे काम करत असलेल्या तीन मजुरांना एका शिळेच्या खाली धनाचा हंडा आढळून आला होता. हंडा उचलून घरमालकाने ताब्यात घेतला तसेच या गुप्तधनाचा बोभाटा होवू नये, म्हणुन त्या कामगारांना पैशाच आमिष दाखविण्यात आले. मात्र त्या कामगारांना घरमालकाने पैसे दिले नसल्याने या प्रकरणाची चर्चा त्यांनी गावात सुरू केली. त्यानंतर ही बाब सर्वत्र पसरली.
काय आहे गावाचा इतिहास?
बेलापुरात गुप्तधन सापडल्याची जोरदार चर्चा सुरु झाल्यानंतर घर मालकांनीच नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करत हे गुप्तधन पुरवजांचे असल्याचे म्हणाले आहे. श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस आणि कोषागारच्या अधिकाऱ्यांनी खटोड यांच्या घरी येवून सरकारी पंचासमोर या हंड्याची मोजमाप करत ताब्यात घेतला. यात 11 किलो चांदीचे 104 शिक्के तसेच जुन्या राणीच्या काळातील नाणी, 1 रुपयाचे 915 शिक्के इतर चार नाणे व आठ नाणी आढळून आले आहेत. बेलापूर हे गाव सिंधू संस्कृती सारखी वसाहत सापडलेल्या दायमाबाद संस्कृती शेजारी वसलेले गाव आहे. याठिकाणी अनेक पडकी वाडे असल्याने कायम धन सापडत असल्याची चर्चा असते. प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या वस्तुंमधील काही वस्तु गायब झाल्याची चर्चा आहे. प्रशासनाने ज्या कामगारांना हे धन सापडले त्यांना पंच का घेतले नाही आणि त्यांची चौकशी का केली नाही? असा सवाल उपस्थित करत आहे.