ETV Bharat / state

विहिरीत क्रेन मशीन पलटी, ३ मजूरांचा जागीच मृत्यू - शिर्डी

कोपरगावमधील हंडेवाडी शिवरात विहिरीचे काम सुरू असताना अचानक क्रेन मशीन विहिरीत पलटी झाल्याने ३ मजूरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर १ मजूर गंभीर जखमी झाला आहे. गेल्या महिन्यातच दहिगाव शिवरातही अशाच प्रकारची घटना घडून २ मजूरांचा मृत्यू झाला होता.

crane machine
author img

By

Published : Mar 27, 2019, 2:26 AM IST

Updated : Mar 27, 2019, 9:34 AM IST

शिर्डी- कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी शिवारात क्रेन मशीन विहरीत पलटी होऊन ३ मजूरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर १ मजूर गंभीर जखमी झाला आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेले इतर मजदूर

हंडेवाडी शिवारातील शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे यांच्या शेतात विहिरीचे काम सुरू होते. या कामासाठी ठेकेदार रवी विठ्ठल जाधव याने इतर भागातून मजूर आणले होते. विहिरीचे काम सुरू असताना अचानक क्रेन विहिरीत पलटी झाली. या घटनेत ठेकेदार जाधवसह इतर २ मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर १ मजूर गंभीर जखमी झाला आहे. तुकाराम देवसिंग असे त्या जखमी मजूराचे नाव असून पुढील उपचारासाठी त्याला कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, २ मयत मजूरांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.

महिनाभरापूर्वीच दहिगाव शिवारात विहिरीत काम करत असताना 2 मजुरांचा अशाच प्रकारे मृत्यू झाला होता आणि आज पुन्हा अशीच घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी शिवारातील प्रमोद लबडे यांच्या शेतात विहिरीचे काम सुरू असताना क्रेन मशीन विहिरीत पलटी झाल्याने
तीन मजुरांचा जागीच मृत्यू झालाय तर एक मजूर
जखमी झाल्याची घटना घडलीय....

VO_ कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी शिवारातील शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे यांच्या शेतात विहिरीचे काम सुरू असताना क्रेन विहिरीत पलटून पडल्याने विहिरीत काम करणाऱ्या ठेकेदार रवि विठ्ठल जाधव राहणार खेडले झुंगे तालुका निफाड जिल्हा नाशिक यासह इतर दोन मजुरांचा जागीच मृत्यू झालाय..तर तुकाराम देवसिंग पाटील राहणार खडका एरंडोल जिल्हा जळगाव हा मजूर जखमी झाला असून याला तातडीने कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे..ठेकेदार रवि जाधव यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यातून विहरीच्या कामासाठी मजूर आणले होते.यात ठेकेदार रवि जाधव याचा ही मृत्यू झाल्याने इतर दोन मयत मजुरांची ओळख पटू शकली नाही..गेल्या महिनाभरापूर्वी दहिगाव शिवारातही विहिरीत काम करत असताना 2 मजुरांचा अशाच प्रकारे मृत्यू झाला होता आणि आज पुन्हा अशीच घटना कोपरगाव तालुक्यात घडल्याने खळबळ उडाली आहे....

BITE_तुकाराम देवसिंग पाटीलBody:27 March Shirdi Crane AccidentConclusion:27 March Shirdi Crane Accident
Last Updated : Mar 27, 2019, 9:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.