अहमदनगर : 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासह इतरही काही सत्रांमध्ये या खासदारांनी सूचीबद्ध केलेले अनेक प्रश्न सभागृहात चर्चेला आले आणि त्यांची उत्तरे संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी सभागृहात दिली. लोकसभेत तरुण खासदारांनी सक्रिय सहभाग घेतल्याचे एका अहवालात स्पष्ट झाल्यानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी या दहा खासदारांचे विशेष कौतुक केले आहे.
चर्चेत सक्रिय सहभाग: या १०मध्ये अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा देखील समावेश आहे. विखे यांनी लोकसभेच्या 11 सत्रांमध्ये, सात खासगी विधेयकांच्या चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. काही मुद्द्यांवर हस्तक्षेप करत जनतेप्रती आपली भूमिका ठामपणे मांडली. गेल्या ४ वर्षांत त्यांनी 496 हस्तक्षेप आणि हरकतीचे मुद्दे मांडले आहेत.
योजनांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना : खासदार विखे यांनी पहिल्याच टर्ममध्ये केवळ विकासकामांवर भर न देता विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसा पोहचेल, याबाबतच्या चर्चेत सहभाग घेऊन योजनांच्या अंमलबजावणीत काही सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या. दरम्यान नवोदित खासदारांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले असून अशाच पद्धतीने जनतेचे प्रश्न मांडण्याचा सल्ला दिला आहे.
पंतप्रधानांनीही केले कौतुक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत विविध चर्चे दरम्यान आम्ही घेतलेल्या सहभागाबद्दल कौतुक केले. आम्ही मांडलेले मुद्दे आणि हरकती या देखील त्यांनी पटलावर घेऊन त्यानुसार सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. हे आमच्यासारख्या पहिल्या टर्मच्या खासदारांसाठी नक्कीच कौतुकाची थाप मिळाल्यासारखं आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. त्यांच्या या कार्याचे जनतेकडूनही कौतुक केले जात आहे.
हेही वाचा: