शिर्डी - जगभर पसरलेल्या कोराना विषाणूने भारतातही शिरकाव केला आहे. जगभरातून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविक येत असतात. त्यामुळे शिर्डीतही चिंतेच वातावरण आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनही आता दक्ष झाले आहे. शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयातही गरज पडल्यास एक वार्ड तयार करण्याची तयारी साई संस्थानने केली आहे.
सबका मालिक एक, हा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डी दर्शनासाठी देशभरातून दररोज लाखो भाविक येतात. त्याचबरोबर विदेशी भक्तही साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. त्यामुळे साई संस्थानने आता कोरोनाला भाविकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. साई संस्थानकडून स्वच्छतेची काळजी घेतली जात आहे. पुढे गरज पडल्यास संस्थानच्या रुग्णालयात एक वार्ड राखीव ठेवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
साई संस्थानच्या साई प्रसादालय, मंदिर परिसर, साईनाथ रुग्णालय या ठिकाणी स्वच्छतेची काळजी साई संस्थानकडून घेतली जात आहे. त्याचबरोबर साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलेले भाविकही आपली काळजी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज अनेक भाविक आपल्या तोंडाला मुखवटे (मास्क) बांधून मंदिर परिसरात आलेले पाहायला मिळत आहे. गेल्या पंधरा दिवसात शिर्डीला पाच लाखांवर भाविकांनी भेट दिली आहे.
हेही वाचा -
राज्यसभेत देशातील कोरोना संसर्गावर चर्चा, आरोग्य मंत्री म्हणाले...
दिल्ली हिंसाचारातील शाहरुखचा थाट..! ४ गर्लफ्रेंड.. शाही पार्ट्या अन् जिमचे फॅड