ETV Bharat / state

डॉक्टर वडिलांचे कोरोनामुळे निधन झालं, मुुलीने मांडली कुटुंबाची व्यथा; ईटीव्ही भारत'चा आढावा

आपले कर्तव्य बजावत असताना अनेक रुग्णाचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, त्यांच्या निधनानंतर कुटुबीयांची झालेली वाताहत अक्षरश: पाहवत नाही. रोजच्या जगण्याचा संघर्ष अधिक गडद करणारे संकट वाढत जाणारा हा प्रवास आज अंगावर आलाय अशी परिस्थिती आहे. अहमदनगर जिल्हातील लोणी जवळील चंद्रापुर येथील लव्हाटे कुटुंबाची आज परिस्थिती यापेक्षा काही वेगळी नाही.

डॉक्टर वडिलांचे कोरोनामुळे निधन झालं, मुुलीने मांडली कुटुंबाची व्यथा

author img

By

Published : Nov 11, 2021, 11:21 AM IST

अहमदनगर (चंद्रापुर) - डॉक्टर म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना अनेक रुग्णाचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, त्यांच्या निधनानंतर कुटुबीयांची झालेली वाताहत अक्षरश: पाहवत नाही. रोजच्या जगण्याचा संघर्ष अधिक गडद करणारे संकट वाढत जाणारा हा प्रवास आज अंगावर आलाय अशी परिस्थिती आहे. अहमदनगर जिल्हातील लोणी जवळील चंद्रापुर येथील लव्हाटे कुटुंबाची आज परिस्थिती यापेक्षा काही वेगळी नाही. रोजच्या आडचणींना कसे समोर जायचे हा मोठा प्रश्न उभा आहे. घरातील कर्ते डॉ. देवीदास लव्हाटे यांच्या अकाली जाण्याने आज या कुटुंबाची अवस्था काय आहे आणि कुटुंबाची आजची काय भावना आहे याबाबत ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.

डॉक्टर वडिलांचे कोरोनामुळे निधन झालं, मुुलीने मांडली कुटुंबाची व्यथा

देवीदास यांच्या भावाचेही कोरोनामुळेच त्याच महीन्यात निधन झाले

राहाता तालुक्यातील चंद्रापुर येथील रहीवाशी देवीदास लव्हाटे हे डॉक्टर होते. कोरोना काळात कंत्राटी वैदकीय अधिकारी म्हणून अकोले तालुक्यातील आदिवासी भागत असलेल्या कोतूळ येथे सेवा देत होते. त्या दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांच्यावर सरकारी आणि खाजगी रुग्णालयत उपचार सुरू होते. मात्र, वीस दिवसांनंतर त्यांनी शेवटी अखेरचा श्वास घेतला. 12 एप्रिला 2021 रोजी त्यांचे निधन झाले. हे दु:ख काय कमी होते म्हणून त्याच काळात देवीदास यांच्या भावाचेही कोरोनामुळेच त्याच महीन्यात निधन झाले. आज या कुटुंबाचा आधार म्हणून कुणी नाही. त्यातच देवीदास यांचा मुलगा आजारी असतो, पत्नीलाही मनक्याचा त्रास आहे. हे सगळे असताना मुलांकडे पाहून ती आई हा संसाराचा गाडा पुढे ओढत आहे. मात्र, सरकारने 50 लाख रुपयांचा विमा देण्याचे जाहीर केले असतानाही त्यामधील रक्कम आणखी कुटुंबाला मिळाली नाही. त्यामुळे आणखी अडचणी वाढल्या आहेत.

विम्याची मुदत ही 23 मार्चलाच संपली

आज लव्हाटे कुटुंब एका पोल्ट्रीच्या शेडमध्ये राहत आहे. लव्हाटे यांचे दुर्दैव हे की ते शासकीय सेवेत काही अडचणींमुळे कायम होवू शकले नहीत. त्यामुळे त्यांच्या म्रुत्युनंतर पीएफ, ग्रँज्युटी आणि शासकीय इनश्युरसचा लाभ त्यांना मिळाला नाही. सरकारने जाहीर केलेल्या पन्नास लाखाच्या विम्याची मुदत ही 23 मार्चलाच संपली होती. तर लव्हाटेनचा म्रुत्यू हा 12 एप्रिलला झाला त्यामुळे त्यांना विम्याचा लाभ मिळालाच नाही.

पैशांअभावी पुढचं शिक्षण कस पुर्ण कराव?

सरकारने पन्नास लाखाची वीमा योजनाही जाहीर केली. पण त्याची मुदत संपून नवी योजना लागु होण्यास मधला एक महीना निघुन गेला. या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील लव्हाटे आणि चाबुकस्वार या दोन डॉक्टरांसह महाराष्ट्रातील पंचवीस डॉक्टरांनी प्राण गमावले. या सर्वांना पन्नास लाखाच्या विमा योजनेचा लाभच मिळू शकलेला नाही. कुटुबीयांनी इतर आर्थिक मदत मिळविण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न केले. मात्र, सरकार दरबारी त्याची दखल घेण्यात आलेली नाही. देवीदास लव्हाटे यांना आपल्या मुलीला डॉक्टर बनवण्याची इच्छा होती. त्यामुळे चेतनाने आता नीटची परीक्षागी दिली आहे. मात्र, पैशांअभावी पुढचं शिक्षण कस पुर्ण कराव हा प्रश्न तीच्यापुढे उभा राहीला आहे.

हेही वाचा - ST Strike : लालपरी शंभर टक्के बंद; ९१८ जणांवर निलंबनाची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.