शिर्डी : मंत्री दिपक केसरकर यांनी शिर्डीत येवुन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी केसरकर म्हणाले की, कटुता कमी करणे हे उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. मी काल ज्यावेळेला त्यांना भेटलो तेव्हा ते भावनाविवश झालेले होते. ( Deepak keskar statement on shivsena unity ) ते काय बोलले. मी त्यांना मानणारा त्यांच्याबद्दल आदर ठेवणारा मनुष्य आहे. त्यामुळे मी त्यांना काहीच उत्तर दिलेले नव्हते. मी फक्त एवढेच म्हटले की, साहेब मला आपल्याबद्दल आदर आहे. तो आदर मी पक्ष सोडताना देखील दाखवला होता. मी त्यांना सांगितले होते की. ज्यावेळेस घर पेटते त्यावेळेस आग अगोदर विझवायला लागते. कशामुळे लागली हे नंतर बघुया. आधी आपले घर सुरक्षित ठेवूयात. ऐकलं नाही. ते मोठे आहेत. मी छोटासा मनुष्य आहे असंही दीपक केसरकर म्हणाले. (Reaction from Deepak Kesarkar)
आपले सहकारी का सोडुन गेले : आपले जवळचे सहकारी आपल्याला मानणारी लोक आपल्याला सोडून गेली याबद्दल दु:ख शंभर टक्के असू शकते. त्या भावना माझ्याकडे व्यक्त केल्या. त्याबद्दल मला खूप चांगले वाटले. आपण त्यांच्याजवळ होतो. त्यांनी भावना व्यक्त केल्या. पण दुसऱ्या दिवशी तोच मजकूर ज्यावेळेला टीव्हीवर दाखवला जातो त्यावेळेला ज्या भावना दुखवला जातात असं दीपक केसरकर म्हणाले. (Deepak keskar statement )
मीडियामध्ये छापून येते तेव्हा त्याचे स्पष्टीकरण मलासुद्धा द्यावे लागते : भावना दुखावल्या जाऊ नये. कारण तो आदर असतो. प्रेमाचा अपमान होता कामा नये. मीडियामध्ये छापून येते तेव्हा त्याचे स्पष्टीकरण मलासुद्धा द्यावं लागते. त्यांच्या लोकांच्या माध्यमातून त्यावरुन ते आपली मते बनवत असतात. त्यामुळे ज्यावेळेला मी या सर्वांवर मत देईल त्यावेळी ते मत उद्धव ठाकरेंना नसेल तर त्यांच्या लोकांनी जे मीडियात प्रसारित केलंय की त्याचं असं उत्तर देईन की. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला प्रेमाची किंमत काय असते ते कळेल. असा इशारा दीपक केसरकर यांनी दिला.
म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो : पैशांनी प्रेम विकत घेता येत नाही. पैशांसाठी मनुष्य विकला जात नाही. त्याचं मन जिंकायला लागते. ते मन एकनाथ शिंदे यांनी जिंकलंय. म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो. काय काय झाले ती प्रत्येक गोष्ट सांगेन. नवीन वर्ष आहे म्हणून उत्तर दिले नाही. ते काय घडले याचे आत्मपरिक्षण मी केले पाहिजे तसे त्यावेळच्या आमच्या पक्षप्रमुखांनी देखील केले पाहिजे. आणि तसे झाले तर मग शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही, असे विधान दीपक केसरकर यांनी केले.