शिर्डी - राज्यात सध्या सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. अशातच सगळ्याच पक्षाचे आमदार मुंबईत तळ ठोकुन आहेत. मात्र, शिवसेनेचे मंत्री आणि साई भक्त असलेल्या दिपक केसरकर यांनी 7 नोव्हेंबरला संध्याकाळी शिर्डीत येवुन साई समाधीचे दर्शन घेतले आहे. तसेच, राज्यात स्थिर सरकार यावे, यासाठी साईबाबांना साकडं घातले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर होवो, तसेच शेतकरी सुजलाम सुफलाम होवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. राज्यातील राजकीय परीस्थातीत शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील तो मुख्यमंत्री होणार, असे सांगत अमित शहा आणि उध्दव ठाकरे यांच्यात जे ठरलय तेच होईल, तसेच यातून मार्ग निघेल, असेही त्यांनी म्हटले आहे.