ETV Bharat / state

'ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने आर्थिक मदत द्या; अन्यथा तीव्र आंदोलन' - राम शिंदे यांचा नुकसान पाहणी दौरा

राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देताना ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज्याचे माजी जलसंधारण मंत्री तथा अहमदनगरचे माजी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी केली. शिंदे यांनी आज कर्जत जामखेड मतदार संघातील राशीन गटांमध्ये अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. तसेत ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने आर्थिक मदत न दिल्यास भाजप तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील शिंदे यांनी दिला.

wet-drought-in-maharashtra
ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने आर्थिक मदत द्या
author img

By

Published : Oct 19, 2020, 12:22 PM IST

अहमदनगर - राज्यात परतीच्या पावसाने आणि त्याचबरोबर समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देताना ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज्याचे माजी जलसंधारण मंत्री तथा अहमदनगरचे माजी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी केली. शिंदे यांनी आज कर्जत जामखेड मतदार संघातील राशीन गटांमध्ये अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने आर्थिक मदत द्या

राशीन गटातील कोळेवाडी, चिलवडी, शिरपुरा, खेड, कोळसेवाडी आदी भागांमध्ये भेटी देत नुकसानीची माहिती घेतली. अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून उभे पीक आडवे झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी होत आहे, या परिस्थितीत राम शिंदे यांनी या भागाचा दौरा करत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी बोलताना शिंदे यांनी सध्या सरकार मधले असलेले लोकच यापूर्वी भाजपला शेतकऱ्यांसाठी तातडीने आर्थिक मदत करा, एकरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्या, अशी मागणी करत होते. मात्र सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालेला आहे. शेतकरी हतबल झालेला असताना सध्याचे सरकार मात्र आता शेतकऱ्यांना कोणतीही तातडीची मदत घोषित करत नसल्याची टीका अप्रत्यक्षपणे ठाकरे सरकारवर केली.

भारतीय जनता पक्ष या मुद्द्यावर आता आक्रमक झालेला असून सरकारने तातडीने राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत केली पाहिजे अशी मागणी केली. नाहीतर पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिंदे यांनी ठाकरे सरकारला दिला.

नगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा दोनशे टक्के अधिक पाऊस झालेला आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतामध्ये असलेला मका, कांदा, द्राक्ष-डाळिंब आदी पिके नष्ट झालेली असून पुन्हा एकदा या शेतकऱ्यांना उभा करण्यासाठी शासनाच्या आर्थिक मदतीची गरज आहे. मात्र केवळ पंचनामे करून पाहाणी दौरे करण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देणे यावर सरकारने भर दिला पाहिजे, असे शिंदे म्हणाले.

मागील भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीने अतिवृष्टीच्या परिस्थितीत तातडीने शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी केली होती, त्याचबरोबर एकरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली होती. आता हेच शिवसेनेचे सरकार राज्यांमध्ये सत्तेत आहे आणि शेतकऱ्यांची परिस्थिती सध्या अतिवृष्टी दयनीय झालेली असताना केवळ पाहणी दौरा करून भागणार नाही. सरकारने तातडीने हतबल झालेल्या शेतकऱ्याला एकरी 50 हजार रुपयांची मदत घोषित करावी. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन त्याअनुषंगाने शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना विविध सवलती द्याव्यात, अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे. या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राम शिंदे यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.