शिर्डी - साईबाब मंदिरात काल्याच्या किर्तनानंतर दहिहांडी ( Dahihandi in Sai temple ) फोडून पुण्यतिथी उत्सवाची सांगता ( Shirdi Saibaba Death anniversary ) करण्यात आली. चार दिवस शिर्डीत साईबाबांचा 104 व पुण्यतिथी उत्सव संस्थान काढुन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आलाय. आज उत्सवाचा शेवटचा चौथा दिवस असल्याने सकाळी साईबाबा मुर्ती आणि समाधीला मंगलस्नान घालण्यात आल त्यानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्याश्री बानायत, त्यांचे पती संजय धिवरे यांच्या हस्ते गुरूस्थान मंदिरात महारुद्राभिषेक करण्यात आला.
4 लाख भाविक साईचरणी नतमस्तक - साईबाबांचा 104 व पुण्यतिथी उत्सवाचा सांगता ( Saibaba Death anniversary ) दिवस असल्यान आज साईमंदिरात काल्याच किर्तन पार पडल. काल्याच्या किर्तनासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि साईभक्त उपस्थीत होते. किर्तनानंतर दहिहांडी फोडून दुपारची मध्यान्ह आरती पार पडली आणि उत्सव समाप्त झाला. या 4 दिवसात 3 ते 4 लाख भाविक साईचरणी नतमस्तक झालेत. या उत्सवा दरम्यान साईबाबांच्या झोळीत भाविकांनी केलेल्या दानाची आज साई संस्थानच्या वतीने कॅश काउंटिंग सुरू आहे. या उत्सवाचा चार दिवसात भाविकांनी साईबाबांना किती दान दिले आहे. याचा आकडा लवकरच समोर येईल.