ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण - अहमदनगर

गाईवर हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अहमदनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण
author img

By

Published : Aug 3, 2019, 4:54 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे बिबट्याने गाईवर हल्ला केला. आज शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अहमदनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

संगमनेरमधील पठार भागात दिवसेंदिवस बिबट्याचा वावर वाढत चाललेला आहे. याच परिसरातील शेतकरी शिवराम आहेर यांच्या घरालगतच असलेल्या गोठ्यात गाय बांधून होती. आज सकाळी गाईंचा हंबरण्याचा मोठा आवाज आल्याने ते गोठ्यात गेले. यावेळी बिबट्याने एका गाईच्या मानेवर हल्ला करून जागेवरच ठार मारल्याचे दिसून आले.

आहेर यांनी घटनेची माहिती वनाधिकाऱ्याला दिली. माहिती मिळताच वनपरीमंडल अधिकारी रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप बहीरट व वनरक्षक एस. बी. धानापुणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.

गेल्या ४ दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याने कोंबड्या फस्त केल्याचा प्रकार घडला होता. आज पुन्हा गाईवर हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे आज ढवळ्या दिवसा बिबट्याने गायवर हल्ला केल्याने शेतकऱ्यांना मध्ये भीतिचे वातावरण निर्मण झालेय....

VO_ संगमनेर तालुक्यातील पठार भागात दिवसांन दिवस बिबट्याचे हल्ले वाढत असून आता ढवळ्या दिवसा घारगांव परिसरातील शिदायकवाडी येथील शिवराम आहेर या शेतक-याच्या राहत्या घरा लगत असलेल्या गोठ्यात दबा धरलेल्या बिबट्याने कालवडीवर हल्ला केलाय..शेतकरी आहेर यांनी नेहमीप्रमाणे काल गायी गोठ्यात बांधल्या होत्या..आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना गाईंचा मोठा आवाज आला असता, ते गोठ्यापाशी गेले यावेळी बिबट्याने एका कालवडीला मानेवर हल्ला करून जागेवरच ठार मारल्याचे त्यांना दिसले....

VO_ या घटनेची माहिती समजताच वनपरीमंडल अधीकारी रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक दिलीप बहीरट व वनरक्षक एस बी धानापुणे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केलाय..गेल्या चार दिवसा पूर्वी याच परिसरात बिबट्याने कोंबड्या फस्त केला होत्या आणि आज पुुन्हा भर दिवसा गायवर हल्ला केल्याने शेतकऱ्यांन मध्ये भीतिचे वातवरण निर्मण झाले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी शेतकार्यनी केली आहे.....Body:mh_ahm_shirdi_leopard_attack_3_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_leopard_attack_3_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.