अहमदनगर - सध्या राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून कोरोनाबाबत खबरदारी घेण्याची गरज आहे. छत्रपती आपले आराध्य आहेत. मात्र, पुजन करताना काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाचा धोका अजूनही संपला नाही. त्यामुळे, शिवजयंतीला नियमावली केल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
हेही वाचा - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी उद्धव ठाकरे 'तो' ठाकरीबाणा दाखवतील का- दरेकर
संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात गरजवंत मुलींना सायकल वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात थोरात यांनी सदर आवाहन केले. ते पुढे म्हणाले, गेल्या तीन दिवसात राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेणे आवश्यक आहे. छोटे कार्यक्रम करावे, हा आमचा आग्रह आहे. काही गोष्टी समजून घेण्याची गरज असून आजवर लोकांनी खूप सहकार्य केले आहे. छत्रपती आपले आराध्य दैवत आहे. दैवताचे पुजन काळजीपूर्वक करावे लागणार आहे. आपण बिनधास्त होत चाललो आहोत, मात्र कोरोनाचा धोका संपलेला नाही.
मोफत वीज देण्याच्या आश्वासनाबाबत मी ऐकलेले नाही. थकबाकी कमी करण्यासाठी महावितरणने अभूतपूर्व योजना लागू केली आहे. वीज निर्मीती आणि वीज विकत घेण्यासाठी मोठा खर्च आहे. हा खर्च देण्यासाठी राज्यातील शेतकरी आणि जनता यांची पैसे देण्यासाठी मदत व्हायला हवी. थकबाकी पूर्ण भरण्याची गरज नाही, काही बाकी भरून आपण निल होवू शकतो, अशी माहिती थोरात यांनी दिली. दरम्यान, पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चौकशी नंतर तथ्य समोर येईल, असे थोरात म्हणाले.
हेही वाचा - साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटेंची नेमणूक वादात