ETV Bharat / state

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड-१९ लॅब कार्यान्वित; १५ स्वॅबची चाचणी - ahmednagar corona cases

सध्या १६ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनामुक्त झालेले तीन पैकी २ जण नगर शहरातील सुभेदार गल्ली येथील तर १ जण वंजारगल्ली येथील आहे. या ठिकाणी कन्टेन्मेंट झोन असल्याने या रुग्णांना बूथ हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येणार आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड-१९ लॅब कार्यान्वित; १५ स्वॅबची चाचणी

author img

By

Published : May 23, 2020, 10:27 PM IST

अहमदनगर - जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हिड-१९ चाचणी प्रयोगशाळा आज शनिवारपासून कार्यान्वित झाली असून आज १५ व्यक्तींच्या घशातील स्त्रावांची तपासणी करण्यात आली. त्यातील १० अहवाल निगेटिव्ह आले असून एका अहवालाचा निष्कर्ष निघाला नसून उर्वरित ४ व्यक्तींचे अहवाल पुन्हा तपासले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. दरम्यान, आज शनिवारी बूथ हॉस्पिटलमधून ३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे एकूण ७२ बाधित रुग्णांपैकी आता ५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १६ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनामुक्त झालेले तीन पैकी २ जण नगर शहरातील सुभेदार गल्ली येथील तर १ जण वंजारगल्ली येथील आहे. या ठिकाणी कन्टेन्मेंट झोन असल्याने या रुग्णांना बूथ हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येणार आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड-१९ लॅब कार्यान्वित; १५ स्वॅबची चाचणी

कोव्हिड-१९ चाचणी प्रयोगशाळेस कालच आयसीएमआरकडून मान्यता मिळाली. काल रात्री आवश्यक लॉग इन आयडी प्राप्त झाल्यानंतर येथील कामकाजास सुरुवात झाली. त्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात १५ व्यक्तींच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. आज दुपारी त्याचा अहवाल प्राप्त झाला असून येथील मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही झाल्याची माहिती डॉ.मुरंबीकर यांनी दिली.

दरम्यान, आतापर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या वतीने १९८६ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी १८५१ व्यक्तींचे स्त्राव निगेटिव्ह आले असून ७२ व्यक्तींचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यापैकी ६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.