शिर्डी - काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवामुळे कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले आहे. त्यामुळे भविष्यात कशी रणनिती असावी हा प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे आमदार आणि कार्यकर्ते खचले असल्याने ते माझ्या भेटीला येत असल्याचे वक्तव्य राधाकृषण विखे पाटलांनी केले आहे. त्यामुळे राजकीय गोटात चर्चा सुरू झाल्या आहेत.
नगर जिल्ह्यातील विखेंच कट्टर राजकीय विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरातांच्या संगमनेरात काही दिवसांपुर्वी सुजय विखेंच्या अभिनंदनाचे बॅनर फाडले होते. त्याविषयी बोलताना विखे म्हणाले, लोकांमध्ये विजय सहन करण्याची क्षमता पाहिजे, तसेच पराभव पचवण्याचीही मानसिकता हवी आहे. आता तर ही सुरूवात आहे, अजून तर बरेच बॅनर लागायचे आहेत, असे सांगत विखेंनी थोरातांना सणसणीत टोला लगावला.
काँग्रेसच्या पराभवानंतर त्यांचे आमदार आणि कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले आहेत. त्यामुळे ते माझ्या भेटील येत असल्याचे वक्तव्य करत राधाकृष्ण विखे पाटलांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फोडले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यात काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार आणि जयकुमार गोरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाही रंगल्या होत्या. त्यामुळे विखेंच्या गळाला कोण लागणार हे सध्यातरी स्पष्ट होताना दिसत नाही.
'आता तर ही सुरूवात आहे, अजून तर बरेच बॅनर लागायचेत'
सुजय विखे यांच्या विजयानंतर बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमध्ये विखेंच्या विजयाचे बॅनर फाडण्यात आले होते. त्यावर बोलताना राधाकृष्ण विख म्हणाले, विजय पचवण्याची क्षमता पाहिजे, त्यामुळे ही तर सुरुवात आहे. अजून तर बरेच बॅनर लागायचे आहेत.