शेवगाव (अहमदनगर)- तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेवगाव शहरात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. सायकल रॅलीचे आयोजन करत आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय यामार्गावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या सूचनेनुसार तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. अमोल फडके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस होत असलेली दरवाढीच्या निषेधार्थ सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आले. केंद्र सरकारने थोडीशी लाज बाळगून इंधन दरवाढ रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात केली. यावेळी शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अमोल फडके यांच्यासह नगरसेवक भाऊसाहेब कोल्हे, सेवादल कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. बाळासाहेब शिंदे, शहराध्यक्ष किशोर कापरे, युवक अध्यक्ष बब्रु वडघने, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, उपाध्यक्ष राजू शेळके, उपाध्यक्ष पांडुरंग नाबदे, कोषाध्यक्ष राजू गिरगे, उपाध्यक्ष निजाम भाई पटेल, महेश निजवे, एनएसयूआय अध्यक्ष महेश काटे, अमोल दहिफळे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष कचरू मगर अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष जब्बार शेख, चंदू निकाळजे, बाजीराव अंगारखे, सुरेश निकाळजे आदी उपस्थित होते.
हेही वाचा -आपल्याच चक्रव्युहात अडकले नाना पटोले: राष्ट्रवादी, सेनेकडून सुरू आहे टीकेचा भडीमार