ETV Bharat / state

कोविड सेंटरबाबत उदासीन आयुक्तांच्या निषेधार्थ काँग्रेसचे मनपात ठिय्या आंदोलन - अहमदनगर शहर काँग्रेस न्यूज अपडेट

'कोरोना संकट काळात आयुक्त साहेब आतातरी ऑक्सीजन द्या', दोनशे व्हेंटिलेटर खाटांसह एक हजार खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करा. याबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महानगर पालिका आयुक्तांना सूचना केल्या होत्या. मात्र याबाबत मनपा आयुक्त उदासीन असल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसच्यावतीने गुरुवारी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आहे.

ahmednagar congress protest
काँग्रेसचे मनपात ठिय्या आंदोलन
author img

By

Published : May 7, 2021, 10:02 AM IST

अहमदनगर - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महानगर पालिका आयुक्तांना अत्याधुनिक कोविड केअर सेंटरबाबत सूचना केल्या होत्या. मात्र याबाबत मनपा आयुक्त उदासीन असल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसच्यावतीने गुरुवारी ठिय्या आंदोलन करण्यात आहे. आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलेला असून तोंडाला प्रतिकात्मक ऑक्सिजन मास्क लावून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह काही कार्यकर्ते हे आंदोलन केले.

कोविड सेंटरबाबत उदासीन आयुक्तांच्या निषेधार्थ काँग्रेसचे मनपात ठिय्या आंदोलन

'कोरोना संकट काळात आयुक्त साहेब आतातरी ऑक्सीजन द्या', दोनशे व्हेंटिलेटर खाटांसह एक हजार खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करा या मागणीसाठी हे आंदोलन अभिनव पद्धतीने करण्यात येत आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता असून या भाजपाच्या सत्तेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिलेला आहे. तर राष्ट्रवादीचे नगरसेवक हे सध्या स्थायी समितीचे सभापती आहेत. यावर भाष्य करत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी महानगरपालिकेत भाजपा-राष्ट्रवादी युतीची सत्ता असल्याची उपहासात्मक टीका करत शहरातील सध्या कोरोना काळात झालेल्या भीषण परिस्थितीत महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर, तसेच शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे जबाबदार असल्याची टीका करत काळे यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे.

काँग्रेस करत असलेल्या आंदोलनाची कारणे -

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गेल्या महिन्यात 26 एप्रिल रोजी कोरोना आढावा बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांना महानगरपालिकेच्या वतीने 1 हजार ऑक्सिजन खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्याबाबत सूचना केली होती. मात्र याबाबत अद्याप आयुक्तांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. या मागणीसाठी शहर काँग्रेसच्यावतीने दोन दिवसांपूर्वीच आयुक्तांच सोबत बैठक घेण्यात आली होती. मात्र यात आयुक्तांकडून कोणतीही सकारात्मक निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी हे आंदोलन सुरू केलेला आहे, तसेच काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपाच्या सहकार्यासह ऑक्सीजन बेड सेंटर निर्माण करण्याची जबाबदारी उचलण्यासाठी महानगरपालिकेला प्रस्ताव दिला होता. आधी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन देणाऱ्या महानगरपालिकेने याला नंतर खोडा घालून हात वर केले असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.

काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आरोप -

काँग्रेसने नगर विकास मंच या अराजकीय व्यासपीठाच्या माध्यमातून त्यासाठीचा लेखी प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अखत्यारीत असणाऱ्या क्रीडा हॉस्टेलची मान्यता या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मिळावी म्हणून अर्ज केला होता. मात्र यावर अधिकारी स्तरावर बुधवारी सायंकाळी चर्चा झाली असता महानगर पालिका आयुक्तांनी महापालिकेच्या विचाराधीन असा कोणताही प्रकल्प नसल्याचे म्हटलेचे वृत्त आल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी यांनी आयुक्तांच्या घूमजाव करीत केलेल्या खोटारडेपणा वर तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. या सर्व प्रकारामागे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असल्‍याचा आरोपही किरण काळे यांनी केला आहे.

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार -

गुरुवारी दुपारी शहर काँग्रेसच्यावतीने आयुक्तांच्या दालनाबाहेर हे आंदोलन सुरू आहे. मात्र यावेळी नाशिक विभागीय आयुक्त यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक असल्याने आयुक्तांसह एकही वरिष्ठ अधिकारी पालिकेमध्ये उपस्थित नव्हते. त्यामुळे मागण्यांबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याने जोपर्यंत याबाबत आयुक्त सकारात्मक निर्णय घेत नाहीत तोपर्यंत काँग्रेसच्या वतीने आंदोलन बेमुदत सुरू राहील असा इशारा किरण काळे यांनी दिला आहे.

-

हेही वाचा - Positive News : कॅन्सरने एक किडनी गमावलेल्या महिलेने केली कोरोनावर मात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.