ETV Bharat / state

Shirdi Rangpanchami Rathyatra : शिर्डीत २२ मार्चला होणार रंगपंचमी रथयात्रा मिरवणूक.. जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी - जिल्हाधिकाऱ्यांनी शिर्डीतील रंगपंचमी रथयात्रेला परवानगी दिली

शिर्डीत दरवर्षी होणारी रंगपंचमी रथयात्रा ( Shirdi Rangpanchami Rathyatra ) मिरवणूक यंदा २२ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ( Ahmednagar Collector ) या मिरवणुकीला परवानगी नाकारली होती मात्र मंदिराची प्रथा सुरु ठेवण्याच्या उद्देशाने मिरवणुकीला परवानगी देण्यात आली ( Collector Grants Permission To Shirdi Rathyatra ) आहे.

शिर्डी रंगपंचमी रथयात्रा मिरवणूक
शिर्डी रंगपंचमी रथयात्रा मिरवणूक
author img

By

Published : Mar 19, 2022, 5:35 PM IST

शिर्डी ( अहमदनगर ) : अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ( Ahmednagar Collector ) प्रतिबंधात्‍मक आदेशान्‍वये कायदा सुव्‍यवस्‍थेच्‍या कारणास्‍तव तातडीने साईबाबांची गुरुवारची पालखी व रंगपंचमी निमित्‍ताने निघणारी रथयात्रा मिरवणूक ( Shirdi Rangpanchami Rathyatra ) स्थगित केली होती. परंतु साईभक्‍तांची श्रध्‍दा, त्‍यांची मागणी आणि मंदिराची प्रथा परंपरा सुरु ठेवण्‍याच्‍या उद्देशाने संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी जिल्‍हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांच्‍याशी तातडीने संपर्क साधत रथयात्रा मिरवणूक सुरु करण्‍याची मागणी केली. त्‍यास मान्‍यता मिळाली असून, २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता रंगपंचमी निमित्‍ताने शिर्डी गावातून साई रथयात्रा मिरवणूक काढण्‍यात येणार ( Collector Grants Permission To Shirdi Rathyatra ) आहे.

गुरुवारची पालखी झाली होती रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १७ मार्च ते २२ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आला आहे. त्यात आदेशात कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे, जाहिरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनिवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारा उपकरण संच वापरणे किंवा वाजविणे यास मनाई करण्यात आली आहे. त्यानुसार शिर्डी पोलिसांनी गुरुवारची पालखी तसेच रंगपंचमीची रथयात्रा मिरवणूक स्थगित करण्याचे पत्र संस्थानला दिले होते. त्यामुळे साईबाबांची १७ मार्च रोजीची नित्याची गुरुवारची पालखी ही रद्द करण्याचा निर्णय तातडीने घ्‍यावा लागला होता.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले पत्र

भाविकांची साईबाबांप्रती असलेली श्रध्‍दा व रंगपंचमीनिमीत्‍त निघणारी रथयात्रा मिरवणूक काढण्याची मागणी होत होती. तसेच मंदिराची प्रथा परंपरा सुरु ठेवण्‍याच्या उद्देशाने संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांना ईमेलव्‍दारे प्रस्‍ताव पाठवला. जिल्हाधिकाऱ्याशी संपर्क साधत संस्थानमार्फत २२ मार्च रोजी रंगपंचमीनिमित्त साईबाबांची रथयात्रा मिरवणुक काढण्याची विनंती केली. त्‍यास जिल्‍हाधिकारी यांनी मौखीक मान्यता दिली आहे. तसेच पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांचेशी देखील मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दुरध्वनीद्वारे संपर्क करुन चर्चा केली असता, त्‍यांनी रथयात्रा मिरवणुकीकरीता सर्वोत्‍परी मदत करण्‍याचे आश्‍वासन दिले. भाविकांनी कायदा सुव्‍यवस्‍थेच्‍या नियमांचे पालन करुन या रथयात्रेचा लाभ घ्‍यावा. तसेच साईभक्‍तांनी व ग्रामस्‍थांनी याबाबत संस्‍थानला सहकार्य करावे, असे आवाहन संस्‍थानचे व्‍यवस्‍थापन मंडाळाचे अध्‍यक्ष आशुतोष काळे व मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.