ETV Bharat / state

Security Devotees Clash in Shirdi : साई संस्थानचे सुरक्षारक्षक आणि भाविक एकमेकांना भिडले - शिर्डी साईबाबा संस्थान

शिर्डीच्या साईबाबा संस्थानमध्ये साईभक्तांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या सुरक्षारक्षक साईभक्तामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. साई मंदिर परिसराच्या पाच क्रमांकाच्या गेटमधूनच भाविकांना बाहेर सोडले जाते, मात्र या दरवाजातून मंदिरात प्रवेश देण्याच्या कारणावरुन साई भक्तांने सुरक्षारक्षकांसोबद वाद घातला. त्यामुळे आगोदर साई भक्त सुरक्षा रक्षकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले.

Clash Between Security In Shirdi
Clash Between Security In Shirdi
author img

By

Published : Mar 31, 2023, 5:21 PM IST

Updated : Mar 31, 2023, 5:40 PM IST

अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानात साईभक्तांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या सुरक्षारक्षक भाविकामध्ये हाणामारीची घटना घडली आहे. साई मंदीर परिसराच्या पाच क्रमांकाच्या गेटमधूनच भाविकांना बाहेर सोडले जाते मात्र, या गेटमधूनच मंदीरात प्रवेश देण्याच्या कारणावरुण सुरक्षा रक्षाकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर नंतर हाणामारी झाले आहे. वादानंतर झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.

फ्री स्टाईल हाणामारी : साई मंदिराच्या पाच क्रमांकाच्या गेट बाहेर मुंबईच्या पालखीत साई भक्त सुरक्षा रक्षक यांच्यात फ्री स्टाईल भांडण झाले. साईबाबा संस्थानचे सुरक्षा प्रमुख अण्णासाहेब परदेशी यांनी सांगितले की, साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागाने शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बॅगवरुन हाणामारी : बाहेरगावी जाणाऱ्या पालखीतील भाविकांना संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केल्याने साई भक्त तसेच सुरक्षा रक्षकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार शिर्डीच्या साई मंदीरात घडला आहे. धक्काबुक्कीनंतर वाद विकोपाला जावून वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आहे. हाणामारीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. मंदीरात राहिलेले बॅग आणण्यासाठी भक्तांने आत जाण्यासाठी रक्षाकांसोबत वाद घातला. साई भक्ताला प्रवेश नाकारण्यात आल्याने सुरक्षारक्षकात तसेच साई भक्तात सुरवातीला बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले.

शिर्डीत रामनवमीची सांगता : शिर्डीच्या साईबाबांच्या नगरीत गेल्या तीन दिवसांपासून श्री रामनवमी उत्सव साजरा होत असून या उत्सवाची आज शुक्रवारी सांगता झाली. शेकडो पालख्या पायी चालत शिर्डीत दाखल झाल्या होत्या. एका पालखीत भाविक तसेच संस्थान सुरक्षा रक्षकांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली होती. त्यावरुन वाद विकोपाला जावून त्याचे रुपांतर हाणामारीत झाले आहे.

आउटगेटने प्रवेशास मनाई केल्याने वाद : गेट क्रमांक 5 हे आउटगेट आहे, तेथून प्रवेश करण्यास परवानगी नाही. मात्र साईभक्तांची एक बॅग साई मंदीरात राहिल्याने साई भक्तांने मंदीरात जाण्यासाठी रक्षकांसोबत वाद घालण्यास सुरवात केली. साई भक्तांनी त्यांना ते घेण्यासाठी आत जाऊ देण्याचा आग्रह धरला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी आऊट गेटऐवजी प्रवेशद्वारातून साई भक्ताला जाण्याची विनंती केली. त्यावरुन साई भक्ताला राग अनावर झाल्याने साई भक्त तसेच साई संस्थानाच्या सुरक्षारक्षकांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा - Girish Mahajan On Sambhaji Nagar Dangal : जाणीवपूर्वक विरोधकांकडून दंगल घडवण्याचा प्रयत्न - गिरीश महाजन

Last Updated : Mar 31, 2023, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.