ETV Bharat / state

Saibaba Temple Shirdi : साईबाबा दर्शनासाठी शिर्डीत येताय? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची

25 ऑक्‍टोबर 2022 रोजी खंडग्रास सुर्यग्रहण (Khandgras Surya Grahan) असल्‍यामुळे शिर्डी साईबाबा समाधी मंदिराच्‍या दैनंदिन कार्यक्रमांच्‍या वेळेत बदल (Change in timings of daily programs Saibaba Temple) करण्‍यात आला आहे. अशी माहीती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली. Saibaba Temple Shirdi

Saibaba Temple Shirdi
साईबाबा मंदिर शिर्डी
author img

By

Published : Oct 22, 2022, 5:36 PM IST

अहमदनगर : 25 ऑक्‍टोबर 2022 रोजी खंडग्रास सुर्यग्रहण (Khandgras Surya Grahan) असल्‍यामुळे शिर्डी साईबाबा समाधी मंदिराच्‍या दैनंदिन कार्यक्रमांच्‍या वेळेत बदल (Change in timings of daily programs Saibaba Temple) करण्‍यात आला आहे. दुपारी 4.40 ते सायंकाळी 6.31 यावेळेत साईबाबांच्या मूर्ती समोर मंत्रोच्‍चार होणार आहेत. मंत्रोच्‍चार होईपर्यंत भाविकांना समाधी मंदिराचे सभामंडपापासुन दर्शन सुरु ठेवण्‍यात येणार असल्‍याची माहिती, संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली. Saibaba Temple Shirdi

दिनचर्या : दिनांक 25 ऑक्‍टोबर 2022 रोजी दुपारी 4.40 ते सायंकाळी 6.61 याकाळात खंडग्रास सुर्यग्रहण आहे. यामध्‍ये दुपारी 4.40 वाजता साई दर्शन बंद होईल. दुपारी 4.50 वाजता साईसमाधी मंदिरात मंत्रोच्‍चार सुरु होईल. सायंकाळी मंत्रोच्‍चार संपल्‍यानंतर सायंकाळी 6.40 वा. साईंचे मंगलस्‍नान होईल. त्‍यानंतर सायंकाळी 6.55 वाजता साईबाबांची शिरडी माझे पंढरपूर ही आरती होईल. सायंकाळी 7.15 वाजता साईबाबांच्या धुपारती होईल. आरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी दर्शनरांगा पुर्वीप्रमाणे सुरु होणार असल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्याश्री बानायत यांनी दिली आहे.

सभामंडपापासुन दर्शन सुरु : दुपारी 4.50 वाजता साईसमाधी मंदिरात मंत्रोच्‍चार सुरु होईल. तसेच सदर ग्रहण काळात साईबाबांच्या मूर्ती समोर मंत्रोच्‍चार होईपर्यंत, भाविकांना समाधी मंदिराचे सभामंडपापासुन दर्शन सुरु ठेवण्‍यात येणार असुन; सर्व साईभक्‍तांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन भाग्‍यश्री बानायत यांनी केले.

ग्रहण कालावधी : यावेळी कार्तिक अमावस्या 24 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5:29:35 पासून असेल. 2022 चे शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण आंशिक असेल. कॅलेंडरनुसार, 2022 वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:29 वाजता सुरू होईल आणि 5:24 वाजता संपेल.

सुतक कालावधी : मिळालेल्या माहितीनुसार, ग्रहणाच्या आधीचा काळ अशुभ मानला जातो आणि त्याला सुतक काळ (Eclipse Sutak times and mythology) म्हणतात. सुतक काळात कोणतेही मांगलिक कार्य केले जात नाही तसेच या काळात कोणत्याही व्यक्तीने नवीन कार्य सुरू करू नये, असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी १२ तास आधी सुरू होतो आणि ग्रहण संपल्यानंतरच संपतो. असे म्हणतात की ग्रहण कुठेही दिसत नसेल तर सुतक नाही. या वेळी भारतात आंशिक सूर्यग्रहण दिसणार आहे, त्यामुळे सुतक वैध असेल. आंशिक सूर्यग्रहणाचे सुतक पहाटे 03:17 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 05:43 वाजता समाप्त होईल. Saibaba Temple Shirdi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.