ETV Bharat / state

Jaggery Chai : साखरेच्या पट्ट्यात..गुळाच्या चहाचा गोडवा - jaggery chai in ahmednagar

आता शहरातही गुळाचा चहा विकणारी वेगवेगळ्या ब्रँड अनेक चहाचे हॉटेल थाटली आहेत. साखरेचा चहा बनवणारे तसेच गुळाचा चहा विकणारे विक्रेते यांच्यात ग्राहक खेचण्यासाठी एक स्पर्धाच सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.

jaggery chai
गुळाचा चहा
author img

By

Published : Feb 14, 2022, 12:18 PM IST

Updated : Feb 14, 2022, 1:02 PM IST

अहमदनगर - अहमदनगर जिल्हा म्हटलं की साखरेचा आगार मानला जातो. या साखरेच्या पट्ट्यात मात्र गुळाच्या चहा चा गोडवा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. परिणामी साखरेच्या चहा पेक्षा गुळाचे चहाची चवच चांगली असते. अनेक चहा प्रेमी अर्थात शौकीन आपली तलफ भागविण्यासाठी गुळाच्या चहाला पसंती देताना दिसत आहे.

व्हीडीयो
अहमदनगर जिल्ह्यात वेगवेगळ्या नावाने आपला ब्रँडनेम बनवून उच्चशिक्षित तरूण बाजारपेठेत आपला चहा विकत आहेत. गुळाचा चहा प्यायल्याने होणारे आरोग्य विषयक फायदे सांगून गुळाचे चहा कडे शौकिनांना आकर्षित करण्याचा फंडा अनेक विक्रेते वापरत आहे. परिणामी या साखरेच्या पट्ट्यात गुळाच्या चहाचा गोडवा अधिक आवडू लागला आहे. त्यामुळे दुकान तसेच मॉलमध्ये गावोगाव गुळाचा खपही वाढताना दिसत आहे. बाजारपेठेत केमिकल विरहित तसेच केमिकलयुक्त असे दोन्ही प्रकारचे गुळ विक्रीस उपलब्ध आहेत.
गुळाच्या चहाचे हॉटेल
आता शहरातही गुळाचा चहा विकणारी वेगवेगळ्या ब्रँड अनेक चहाचे हॉटेल थाटली आहेत. साखरेचा चहा बनवणारे तसेच गुळाचा चहा विकणारे विक्रेते यांच्यात ग्राहक खेचण्यासाठी एक स्पर्धाच सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. आमचाच चहाचा ब्रँड कसा भारी आहे. हे पटवून देण्यासाठी तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत आहे. गुळाचा चहा पिणाऱ्या शौकिनांनी आपल्या घरी महिलांना गुळाचा चहा बनवण्यास सांगितल्यास गुळाचा चहा बनवताना तो वारंवार फुटत असल्याने महिलांची मोठी पंचाईत होताना दिसत आहे. एवढे करूनही गुळाचा चहा घरी योग्य पद्धतीने व हाॅटेल सारखा बनला जात नसल्याने घरात मात्र गुळाच्या चहाच्या शौकीनांना नाईलाजास्तव साखरेच्या चहाला पसंती द्यावी लागत आहे.

Last Updated : Feb 14, 2022, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.