ETV Bharat / state

रेकॉर्ड ठिक असेल तर ईडी मागे लागणार नाही; केंद्र सरकार टीका करू नये - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - ramdas athwale on shivsena

राज्यात महाविकास आघाडी सरकारचे अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. या कारवाई बाबत विचारणा केली असता, आठवले म्हणाले, की ईडी हे खात स्वतंत्र असून मोदी सरकार कोणावरही अन्याय करणाेर सरकार नाही. ते सर्वांना साथ देणारे सरकार आहे. जर रेकॉर्ड ठिक असेल तर ईडी मागे लागणार नाही. यामुळे ज्या ठिकाणी अनियमितता आढळते त्या ठिकाणी ईडी चौकशी होते. त्यामुळे मुद्दाम कोणाला त्रास देण्याचा हेतू मोदी सरकारचा नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीत दिली आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले
author img

By

Published : Oct 9, 2021, 9:58 AM IST

Updated : Oct 9, 2021, 10:39 AM IST

शिर्डी - लखीमपूर येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. मात्र महाराष्ट्रातही शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अनेक घटना घडलेल्या आहेत. लखमीपुर येथे घड़लेली घटना अतिशय निदनीय असबन या घटनेची चौकशी सुरू आहे. या घटनेतील दोषींवर करवाई करण्याची मागणी आम्ही केली असल्याची माहिती केंदीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीत पत्रकारांशी बोलतांना दिली. तसेच विरोधकांना आता लखीमपूरचा विषय मिळाल्याने ते मोदी आणि केंद्र सरकारवर टीका करत असल्याचेही मत व्यक्त केले. दरम्यान सध्या राज्यात सुरू असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाईवर मत व्यक्त करताना रेकॉर्ड ठिक असेल तर ईडी मागे लागणार नसल्याचे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

शिर्डीतील सिद्धसंकल्प लॉन्स येथे रिपब्लिकन पार्टी इंडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. दरम्यान, यावेळी आठवले यांनी नेहमी प्रमाणे आपल्या कवितेतून महाविकास आघाडीसरकारवर निशाणा साधला. 'मी येथे आलो आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना साथ देण्यासाठी, आणि आम्ही दोघे मिळून मुबईला जात आहोत महाविकास आघाडीशी बदला घेण्यासाठी, अशा चारोळीच्या माध्यमातून त्यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला.

लखीमपूर मुद्दा पकडून मोदी सरकारला बदनाम करण्याचा डाव उधळून लावणार-

लखीमपुरचा मुद्दा पकडून मोदी सरकारला बदनाम करण्याचा डाव महाविकास अघाडीचा आहे. मात्र आम्ही यांचा हा डाव उधळून लावणार आहोत. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर मी अनेक वर्ष काम केले आहे. मात्र लखीमपूरचा घटनची जालीयन वाला बागेशी तुलाना करणे ही बाब चुकीची आहे. या प्रकाराबाबत येत्या 11 तारखेला राज्यात पुकारलेला बंद हा अनाठाई असल्याची भूमिकाही आठवले यांनी यावेळी स्पष्ट केली.

भाजप बरोबर या अजुनही वेळ गेलेली नाही....

शिवसेनेला आपले नुकसान करायचे नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. मी अनेक वेळा ही भूमिका मांडली आहे, की अडीच अडीच वर्ष दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेला आणि अडीच वर्ष भाजपला अशा पद्धतीने युती होऊ शकते. शिवसैनिकांचीही आतुन इच्छा आहे की शिवसेना आणि भाजप बरोबर यावे. उद्धव ठाकरे यांनी अजुनही विचार करावा बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर उद्धव ठाकरे यांनी भाजप बरोबर येण्याचा विचार करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी शिवसेनेला केले.

रेकॉर्ड ठिक असेल तर ईडी मागे लागणार नाही-

सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकारचे अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. या कारवाई बाबत विचारणा केली असता, आठवले म्हणाले, की ईडी हे खात स्वतंत्र असून मोदी सरकार कोणावरही अन्याय करणाेर सरकार नाही. ते सर्वांना साथ देणारे सरकार आहे. जर रेकॉर्ड ठिक असेल तर ईडी मागे लागणार नाही. यामुळे ज्या ठिकाणी अनियमितता आढळते त्या ठिकाणी ईडी चौकशी होते. त्यामुळे मुद्दाम कोणाला त्रास देण्याचा हेतू मोदी सरकारचा नाही. ज्यांना कोणाला धंदापाणी करायचे असेल त्यांनी आपले रेकॉर्ड साफ ठेवले पाहिजे, ते रेकॉर्ड जर ठीक नसेल तर ईडी चौकशी करणार , ईडी खात जरी केंद्र सरकारचा अंडर असेल तरी ईडीला आदेश देण्याचे काम केंद्र सरकार करत नसल्याचेही मत व्यक्त करत आठवले यांनी विरोधकांना टोला लगावला.

ड्रग्स हटाव मोहीम....

अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणापासून बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन वारंवार पुढे येत आहे. क्रूझ जहाजावर छापेमारी करण्यात आली. यामध्ये ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ड्रग्ज वापराचा हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून रिपब्लिकन इंडिया पार्टीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा अभिनेत्री पायल घोष आणि मी येत्या दोन दिवसात 'बॉलिवूडमधून ड्रग्स हटाव' ही मोहीम राबवणार असल्याचेही यावेळी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे येणार एकाच व्यासपीठावर

हेही वाचा - cruise drug case : चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रींच्या घर आणि कार्यालयावर एनसीबीची छापेमारी

Last Updated : Oct 9, 2021, 10:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.