ETV Bharat / state

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा उत्सव दिवाळीप्रमाणं साजरा होणार; 499 रुपयात 'एवढे' फटाके उपलब्ध - स्वस्त दरात फटाके उपलब्ध

Ram Mandir Pran Pratishtha Festival : अयोध्येतील श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा उत्सव दिवाळीप्रमाणे साजरा करण्यात यावा यासाठी (Firecrackers at cheap rates) शिर्डीतील फटाके व्यावसायिक रविंद्र गायके यांनी शिर्डीतील पिंपळवाडी रोडवर एक फटाका स्टॉल लावले आहे. (January 22) येथे अवघ्या 499 रुपयात मुबलक फटाक्यांचा स्टॉक विक्रीस उपलब्ध करून देण्यात आला आहे. (businessman Ravindra Gayke) नागरिकांना हा उत्सव दिवाळीप्रमाणे साजरा करावा, असं आवाहन गायके यांनी केलं आहे.

celebrate Shri Ram Pranapratistha
फटाका दुकान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 19, 2024, 4:31 PM IST

फटाका विक्रीच्या हेतू विषयी माहिती देताना दुकानमालक रविंद्र गायके

शिर्डी (अहमदनगर) Ram Mandir Pran Pratishtha Festival : येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्यात श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. या सोहळासाठी ज्या राम भक्तांना जाता येणार नाही असे भक्त आपल्या घरीच दिवाळी साजरी करणार आहेत. (Ram Temple in Ayodhya) याच अनुषंगाने शिर्डीतील फटाके व्यावसायिक रविंद्र गायके यांनी शिर्डीतील पिंपळवाडी रोडवर एक फटाका स्टॉल लावत 1 हजार फटाक्यांची लड, झाड स्पेशल 1 बॉक्स, भुईचक्र 1 बॉक्स, सुरसुरी बॉक्स, आयटम बॉम्ब 1 बॉक्स एवढे फटाके चक्क 499 रुपयात शिर्डीसह पंचक्रोषीतील श्रीराम भक्तांनासाठी उपलब्ध करून दिलेय. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्याला ज्या राम भक्तांना जाता येणार नाही अशा भक्तांनी आपल्या घरीच फटाके फोडून मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करावी यासाठी आम्ही राम भक्तांना अतिशय अल्प दरात फटाके उपलब्ध करून दिले असल्याचं फटाका स्टॉल मालक रविंद्र गायके यांनी सांगितलं आहे.

फटाका स्टॉल उद्‌घाटनाला या मान्यवरांची उपस्थिती: प्रभू श्रीराम मूर्तीची पूजा करत नारळ फोडून या फटाका स्टॉलचे आज उद्घाटन करण्यात आलेय. यावेळी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, भाजपा शहराध्यक्ष सचिन शिंदे, माजी नगरसेवक अशोक गोंदकर, सर्जेराव कोते, विश्व हिंदू परिषदेचे सुरेंद्र महाले, चेतन कोते यासह आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध धार्मिक विधी यज्ञ, होम हवन केले जातयं. 22 जानेवारीला होणाऱ्या या ऐतिहासीक धार्मिक कार्यासाठी आपला सहभाग असावा या भावनेतून अनेक जण आपआपले योगदान देत आहेत.

14 हजार लाडू वाटपाचा कार्यक्रम: 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत असून देशभरातील प्रत्येक शहरात विविध संस्था संघटना हा उत्सव साजरा करण्याची तयारी करत आहे. नाशिकमधील धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना आणि नववर्ष स्वागत समितीकडून मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा भागात शुद्ध देशी तुपामध्ये बनवलेले 14 हजार लाडू वाटप करून हा उत्सव साजरा करणार आहेत. त्या अनुषंगाने तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून लाडू बनवण्यासाठी 150 किलो चणाडाळ, तितकेच तूप, 200 किलो साखर आणि 20 किलो काजू बदाम याचा वापर करण्यात येत आहे. नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटनेचे 300 सदस्य असून संघटनेने त्यांना साखर, चणाडाळ, तूप, सुकामेवा देण्यासाठी आवाहन केलं होतं, त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. 19 जानेवारीपासून प्रत्यक्षात लाडू बनवायला सुरुवात झाली आहे. 22 जानेवारीला रविवार कारंजा येथे नववर्ष स्वागत समिती आणि नाशिक धान्य किराणा गावक व्यापारी संघटना एकत्रित रामाचे मूर्तीचे पूजन करणार आहे. त्यानंतर लाडू वाटप करून आनंद उत्सव साजरा करणार आहे.

हेही वाचा:

  1. "लहानपणी मला पण अशा घरात रहायला मिळालं हवं होतं", सोलापुरात बोलताना पंतप्रधान मोदी भावूक
  2. जुन्या वाहनाचं काय करायचं याची काळजी सोडा; ई वाहनामध्ये करता येणार रुपांतर, संभाजीनगरच्या तरुणानं शोधलं अनोखं तंत्रज्ञान
  3. 'पिल्लू फक्त दोन मिनिटं त्रास होईल' असं म्हणत प्रियकराने प्रेयसीला संपवलं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.