शिर्डी (अहमदनगर) - राज्य शासनाच्या आदेशाने साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले असून दिनांक १६ नोव्हेंबर ते दिनांक २४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत सुमारे ४८ हजार २२४ साईभक्तांनी साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घेतला. तर या काळात साईभक्तांकडून विविध प्रकारे ०३ कोटी ०९ लाख ८३ हजार १४८ रुपये देणगी संस्थानला दिली आहे.
रोख स्वरुपात एकूण ३ कोटी ९ लाख
दिनांक १६ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत रोख स्वरुपात एकूण ३ कोटी ९ लाख ८३ हजार १४८ रुपये इतकी देणगी प्राप्त झालेली आहे. यामध्ये दक्षिणापेटी मोजणी रुपये १ कोटी ५२ लाख ५७ हजार १०२, देणगी काऊंटर ३३ लाख ६ हजार ६३२ रुपये, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर आदी रुपये १ कोटी २२ लाख ५० हजार ८२२ रुपये व ६ देशांचे परकीय चलन अंदाजे रुपये १ लाख ६८ हजार ५९२ यांचा समावेश आहे. तर ६४.५०० ग्रॅम सोने व ३८०१.३०० ग्रॅम चांदी संस्थानला देणगी स्वरुपात प्राप्त झालेली आहे.